बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) – 2025 मधील नवीन बदल

महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक 18 जून 2025 रोजी नवीन शासन निर्णय (जीआर) जाहीर केला असून त्यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक वस्तू संचामध्ये (Essential Kit) मोठे बदल करण्यात आले आहेत

काय आहे अत्यावश्यक वस्तू संच

बांधकाम कामगारांना दिला जाणारा एक उपयुक्त आणि जीवनावश्यक वस्तूंचा संच म्हणजेच “Essential Kit” यामध्ये कामगारांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त वस्तूंचा समावेश केला जातो

नवीन शासन निर्णयातील प्रमुख मुद्द

  1. पूर्वीच्या 2017 च्या जीआरमध्ये फक्त 7 वस्तू दिल्या जात होत्या
  2. आता 2025 च्या नवीन जीआरमध्ये 10 वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे
  3. या वस्तू अधिक उपयोगी आणि मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहेत

कोणत्या 10 वस्तू मिळणार

क्रमांकवस्तूचे नाव
1पत्र्याची पेटी
2प्लास्टिकची चटई
3धान्य साठवण ड्रम – 25 किलो क्षमता
4धान्य साठवण कोठी – 22 किलो क्षमता
5बेडशीट
6चादर
7ब्लँकेट
8साखरेचा डबा
9चहा पावडरचा डबा
10वॉटर प्युरिफायर – 18 लिटर क्षमतेचा

कोण पात्र आह

  • महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहतील

अर्ज कुठे करायचा

कामगारांनी खालील कार्यालयांमध्ये अर्ज सादर करावा लागेल

  • प्रभारी कामगार आयुक्त
  • सहाय्यक कामगार आयुक्त
  • सरकारी कामगार अधिकारी
  • जिल्हा कामगार सुविधा केंद्र

काही महत्वाच्या सूचना

  • अर्ज विहित नमुन्यात भरावा लागेल
  • योजनेचा लाभ एकदाच मिळतो
  • वस्तू वितरण स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून केले जाईल
  • अधिक माहितीसाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट

ही योजना म्हणजे बांधकाम कामगारांच्या जीवनात थोडीशी आर्थिक आणि सामाजिक मदत अशा उपयुक्त योजना प्रत्येक गरजवंत कामगारापर्यंत पोहोचायला हव्यात त्यामुळे ही माहिती शेअर करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment