Mpsc Recruitment 2026:संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येइल.
३.१ प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शतीची पूर्तता करणा-या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
३.२ अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी:
पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतूदी:-
४.१ पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
४.२ प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवगांपैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत. जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणा-या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे संवर्ग पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित/अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्व परीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल, त्याच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या पोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
४.३ जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणा-या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल/वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.
४.४ पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील
४.५ पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धिपत्रकाद्वारे करण्यात येईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संची वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही.
४.६ भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाकडून प्राप्त संबंधित मागणीपत्रानुसार आहे. तसेच, वर नमूद पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल/वाढ होऊ शकेल,
४.७ पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील,
४.८ विविध सामाजिक प्रवर्ग, महिला, प्राविण्यप्राप्त खेळाडू, दिव्यांग व अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहोल
४.९ शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांक- महि आ२०२३/प्र.क्र.१२३/कार्या २ दिनांक ०४ मे २०२३ अन्याये विहित कार्यपद्धतीनुसार अराखीव महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी, अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवगातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रह करण्यात आली आहे.
४.१० अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रोमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील.
४.११ महिलांसाठी आरक्षित पर्दाकरिता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ प्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्यावाचत तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन-क्रिमिलेअरमध्ये मोडत असल्याबाबतथा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.
४.१२ विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती. (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंचित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
४.१३ अर्ज करताना एखादी जात/जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिका-याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात्/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
४.१४ समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-१०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ, दिनांक १३ ऑगस्ट, २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-१११८/प्र.क्र.३९/१६-३. दिनांक १९ डिसेंबर, २०१८ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
४.१५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्लूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः राजधो-४०११/प्र.क्र.३१/१६-अ. दिनांक १२ फेब्रुवारी, २०१९ व दिनांक ३१ मे, २०२१ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर जाहिरात एप्रिल, २०२६ मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे आधिकदृष्टया दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन २०२५-२०२६ अथवा २०२६-२०२७ या आधिक वर्षाचे परंतु, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक (दिनांक ३० एप्रिल, २०२६) व त्यापूर्वीचे आधिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, अर्ज सादर करताना अपलोड (Upload) करणे आवश्यक राहील.
४.१६ सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ व संबंधित शासन निर्णय दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिराती संबंधित शिफारशी व नियुक्त्या उक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणाच्या अधीन राहून करण्यात येतील. त्या अनुषंगाने आयोगामार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक जाहीरातीस लागू राहतील.
४.१७ शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः बीसीसी/प्र.क्र.७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरीता आरक्षण विहित करण्यात आले असून शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक वोसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-५. दिनांक २८ जून, २०२४ छ०५ जुलै, २०२४ अन्वये विहित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
४.१८ शासन शुद्धिपत्रक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांकः संकीर्ण-२०२३/प्र.क्र.७६/मावक, दिनांक ०९ मार्च, २०२३ अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गटात मोडत नसल्याचाबतची पडताळणी करण्यासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर जाहिरात एप्रिल, २०२६ मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे उमेदवारांनी सन २०२५-२०२६ अथवा २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना अपलोड (Upload) करणे अनिवार्य राहील.
४.१९ सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करणेचावत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल, याबावतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
४.२० अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
४.२१ कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संशेला भारतीय लोकप्रतिनिधत्य कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.
४.२२ सामाजिक अथवा समांतर आरक्षणाचा अथवा सोयी सवलतीचा दावा करणा-या उमेदवाराकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वेध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. वेध प्रमाणपत्रांचा कालावधी संबंधित शासन आदेशावरील तरतुदीनुसार (लागू असेल त्याप्रमाणे) ग्राह्य समजण्यात येईल.
४.२३ सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.






