ग्रामीण भागातील लाखो शेतकरी आणि कामगारांसाठी मनरेगा योजना (MGNREGA)अत्यंत महत्त्वाची आहे या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची कुशल मंजुरी (Skilled Labour) आणि मटेरियल बिल काही महिन्यांपासून प्रलंबित होते मात्र आता केंद्र सरकारने सुमारे 1409 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे वर्ग केल्यानंतर थकित पेमेंट हळूहळू लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे
अनेक शेतकरी आणि कामगारांना प्रश्न पडतो की आपले बिल मंजूर झाले का? पेमेंट कधी येणार किंवा पेमेंट जनरेट झाले आहे का? आता हे सर्व माहिती तुम्ही मोबाईल वरून काही मिनिटात ऑनलाइन तपासू शकता या लेखामध्ये आपण मनरेगा पेमेंट स्टेटस मोबाईल वर कसे तपासायचे याची नवीन आणि सोपी पद्धत पाहणार आहोत
मनरेगा योजना म्हणजे काय?
मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) ही भारत सरकारची ग्रामीण भागासाठी असल्याने एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण नागरिकांना दरवर्षी 100 दिवस रोजगाराची हमी दिली जाते त्याचबरोबर या
योजनेमध्ये खालील कामे केली जातात.
- शेततळे आणि जलसंधारण कामे
- मातीची कामे आणि बांधकाम
- गावातील रस्ते विकास
- वृक्षलागवड
- नाले आणि बंधारे बांधकाम
MANREGA या कामामध्ये काम करणाऱ्या मजुरांना मजुरी आणि काही कामासाठी मटेरियल खर्च दिला जातो
थकित मनरेगा का अडकते
काही वेळा लाभार्थ्याचे पेमेंट खालील कारणामुळे उशीर होतो
केंद्र सरकारकडून निधी उशिरा मिळणे
FTO (Fund Transfer Order) प्रक्रिया पूर्ण न होणे
तांत्रिक समस्या
बँक खात्याची पाताळणी प्रलंबित असणे
मात्र आता निधी उपलब्ध झाल्यानंतर थकीत बिलाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे
मोबाईल वरून how to check nrega payment status online
खालील स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचे पेमेंट टेटस पाहू शकता मोबाईल मध्ये ब्लाउजर उघडा
सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Google Chrome किंवा कोणत्या इंटरनेट ब्राउजर उघडा
त्यानंतर का अधिकृत वेबसाइट सर्च करा https://nrega.dord.gov.in/MGNREGA_new/Nrega_home.aspx
ब्राउझर मध्ये खालील वेबसाईट सर्च करा nrega.dord.gov.in
वेबसाईट ओपन करा सर्च केल्यानंतर मनरेगा अधिकृत पोर्टल ओपन करा Desktop ऑफ साईट चालू करा मोबाईल वर वेबसाईट व्यवस्थित दिसण्यासाठी वर तीन दिसणार्या तीन डॉट वर क्लिक करा डेस्कटॉप साईट हा पर्याय निवडा
Reports पर्याय निवडा वेबसाईट मध्ये खालील Key Features – Reports पर्याय क्लिक करा
तुमचे राज्य निवडा त्यानंतर तुमचे राज्य निवडा उदाहरण Maharashtra जिल्हा निवडा
त्यानंतर तुमच्या district (जिल्हा) निवडा उदाहरण संभाजीनगर, नाशिक, जालना, पुणे इतर जिल्हे
तालुका/ Block निवडा त्यानंतर तुमचा तालुका Block निवडा
तुमचे गाव निवडा village गाव निवडा
Material Procurement Report पोर्टल रिपोर्ट ओपन करा
गाव निवडल्यानंतर खाली पर्याय दिसेल
Material Procurement Report
त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची कामाची आणि बिलाची माहिती दिसते
पेमेंट स्टेटस मध्ये काय माहिती दिसते
या रिपोर्टमध्ये खालील माहिती दिसते
Bill Date-बिल तयार झाल्याची तारीख
Date of payment पेमेंट झाल्याची तारीख कामाचे तपशील
उदाहरण
| Bill Date | Date of payment |
| 25 November 2025 | 26 February 2026 |
Date of payment दिसल्यास काय करावे जर Date of payment असले तर पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाली आहे साधारण 1 ते 3 दिवसात पैसे खात्यात येतात Date of payment रिकामे असल्यास काय अर्थ जर Date of payment Blank असेल तर पेमेंट अजून प्रक्रियेत आहे निधी उपलब्ध झाल्यानंतर पेमेंट होईल
म्हणजे तुमचे बिल अजून मंजूर झालेले नाही
मनरेगा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
मनरेगा योजनेचा लाभ घेताना खालील गोष्टी लक्षात ठेवा
- तुमचे बँक खाते आधाराची लिंक असावे
- जॉब कार्ड माहिती योग्य असावी
- ग्रामपंचायत कडून माहिती घेत राहा
- नियमित ऑनलाईन पेमेंट स्टेटस तपासा
निष्कर्ष मनरेगा योजनेअंतर्गत थकित मटेरियल आणि कुशल मंजुरी बिलाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत तुम्ही वरील पद्धतीने मोबाईल वरून मनरेगा स्टेटस तपासू शकता जर तुमचे रिपोर्टमध्ये Date of payment दिसत असेल तर काही दिवसात पैसे जमा खात्यात जमा होण्याची शक्यता आहे





