अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना : कोण पात्र कोण अपात्र शेतकऱ्यांना हवाय बदल

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2026 च्या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे राज्य सरकारच्या वतीने 2 लाख रुपये पर्यंत ची कर्जमाफी आणि नेहमीत कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाची प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे ही घोषणा होताच राज्यातील शेतकरी वर्गांमध्ये अशी चे वातावरण निर्माण झालेले अनेक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे आर्थिक दिलासा देखील मिळाला आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे

मात्र या गोष्टीने सोबतच अनेक प्रश्न अनेक शंका देखील उपस्थित होऊ लागला आहे काही शेतकरी संघटना आणि शेतकरी नेते या योजनेबद्दल बदल करण्याची मागणी करत आहे कर्जमाफीची पात्रता अपात्रता 50 हजार रुपयांच्या अनुदान कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात सभ्रम आणि अस्थिरता निर्माण झाली आहे

कर्जमाफीची घोषणा का करण्यात आली

गेल्या 3 ते 4 वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहेत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि त्यातील कमी दर या सर्व समस्या मुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमजोर कमकुज झाली आहे विशेष 2025 च्या खरीप हंगाम अनेक भागात अतिवृष्टी आणि हवामानातील बदलल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली होती विविध शेतकरी संघटनांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली होती त्यानंतर सरकारने अर्थसंकल्पात 2 लाख पर्यंत ची कर्जमाफी आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाची प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली

खरीप 2025 च्या खर्चाचा प्रश्न

kharif anudan 2025 या कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे खरीप हंगाम 2025 मध्ये घेतलेल्या कर्जाचा आहे अनेक शेतकऱ्यांनी 2025 मध्ये नव्याने पीक कर्ज घेतले आहे परंतु सरकारकडून प्राथमिक स्वरुपात अशी माहिती देण्यात आली आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कर्जमाफी साठी पात्र मानले जाईल त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत कारण अनेकांनी 2025 नवीन कर्ज घेतले असेल ते या योजनेत समाविष्ट होईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे

की खरीप 2025 मध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीचा विचार करून त्या काळातील कर्ज माफी मध्ये सामाविष्ट केले पाहिजे अनेकांनी असेही सांगितले आहे की समितीचा अहवाल एप्रिल मध्ये आला आणि कर्जमाफी जून पर्यंत आली तरी चालेल पण खरीप 2025 मधील कर्ज या योजनेत समाविष्ट झाले पाहिजे

नियमित कर्जदार शेतकऱ्यांची समस्या

कर्ज माफीच्या घोषणेनंतर दुसरा मोठा मुद्दा म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा आहे महाराष्ट्रात अनेक शेतकरी असे आहेत जे दरवर्षी पीक कर्ज घेतात आणि वेळेवर परतफेड करतात उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने 2020 पासून 2025 पर्यंत नियमित कर्ज घेतले आणि वेळेवर घेतले आणि वेळेवर भरले पण असा समज या शेतकऱ्याने 2025 मध्ये दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि त्या अतिवृष्टीमुळे त्याचे पीक नुकसान झाले तर अशा परिस्थितीत या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी शक्य होऊ शकत नाही अशा शेतकऱ्यांना फक्त 50 हजार रुपयांचे अनुदान देणे पुरेसे ठरणार नाही असे अनेकांचे मत आहे त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी किमान 1 लाख रुपये अनुदान देण्याची मागणी होत आहे काही संघटनांनी तर हे अनुदान दीड लाख रुपये पर्यंत वाढविण्याची मागणी देखील केली आहे

2 लाख कि 3 लाख कर्ज माफी

सुरुवातीला काही ठिकाणी तीन लाख रुपया पर्यंत कर्जमाफी होईल अशी चर्चा होती परंतु सध्या सरकारने 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे अनेक शेतक-यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहेत त्यामुळे उर्वरित कर्जव्याज माफी मिळणार नाही का किंवा त्यासाठी काही वेगळा निकष केला जाणार का याबाबत अद्याप स्पष्ट झालेली नाही याबाबत शासन याचा अधिकृत शासन निर्णय जीआर अद्याप जाहीर झालेला नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रकारच्या अफवा आणि अंदाज पसरत आहे

समितीचा अहवाल आणि पुढील निर्णय

सरकारने कर्जमाफी संदर्भात एक समिती स्थापन केली आहे या समितीचा मुख्य उद्देश के तात्पुरती कर्जमाफी देणार नसून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमाफी करण्यासाठी उपाययोजना सुचवणे आहे ही समिती कर्जबाजारीपणा मागील कारणाचा अभ्यास करून भविष्यात अशा परिस्थितीत ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाय सुटणार आहे या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर सरकारकडून याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील

बजेटमधील घोषणा आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी

अर्थसंकल्प सादर करताना अनेक योजना जाहीर केल्या जातात काही वेळा बजेट मध्ये तरतूद नसली तरी नंतरच्या अधिवेशनात किंवा पूरक मागण्या द्वारे निधी उपलब्ध करून दिला जातो कर्जमाफीची घोषणा देखील अशीच पद्धतीने करण्यात आली आहे या घोषणेचे स्वागत होत असले तरी ती अंतिम निर्णय नसतो शासन निर्णय आणि अधिकृत मार्गदर्शक तत्वे आल्यानंतरच या योजनेची अंतिम रूपरेषा स्पष्ट होणार आहे

बदलाची मागणी का होते आहे

सध्या शेतकरी संघटना आणि शेतकरी नेते काही महत्त्वाच्या बदलाची मागणी करत आहेत त्यामुळे मुख्यता पुढील मुद्दे आहे

  • खरीप 2025 मधील कर्जाचा समावेश करावा
  • नियमित कर्जदार शेतकऱ्यांना अधिक अनुदान द्यावी
  • कर्जमाफीची मर्यादा वाढवण्याचा विचार करावा
  • योजनेचे निकष स्पष्ट करावेत

अनेकांचे मत आहे की शासन निर्णय (GR) घेण्यापूर्वी या मागण्या सार्थक पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यामुळे योजनेत काही सकारात्मक बदल होण्याची शक्यता वाढू शकते पुढील काळातील आव्हाने शेतकऱ्यांसमोर भविष्यातील हवामान बदल हे मोठे आव्हान आहे काही तज्ञांच्या मते पुढील वर्ष दुष्काळी असण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे केवळ कर्जमाफी देऊन समस्या पूर्णपणे सुटणार नाही शेतकऱ्यांना हमीभाव, सिंचन सुविधा, पायाभूत सुविधा, बाजारपेठेची उपलब्धता आणि पीक विमा योजना मजबूत करणे या बाबी देखील तितकेच महत्त्वाचे आहे जर या सर्व बाबींचा एकत्रित विचार केला गेला तरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते

निष्कर्ष एकूणच पाहता 2026 च्या बजेट मध्ये जाहीर झालेली 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक एक घोषणा आहे मात्र या अंतिम स्वरूप सध्या स्पष्ट झालेले नाही समितीचा अहवाल शासन निर्णय आणि पुढील मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच कोण पात्र आणि कोण अपात्र याबाबत स्पष्टता येईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवा आपल्या मागण्या संघटनाच्या माध्यमातून मांडणे गरजेचे आहे भविष्यात या योजनेत शेतकऱ्यांच्या हिताचे बदल होती आणि त्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा मिळेल अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली जात आहे

Leave a Comment