महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे बदलत्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चिता अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकरिता विहीर बोअरवेल सोलर पंप यासारख्या सिंचन सुविधा देण्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जाती ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे
या योजनेमध्ये विशेष इनवेल बोरवेल साठी 40 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते ही मदत प्रामुख्याने दोन योजनेअंतर्गत उपलब्ध आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या लेखामध्ये आपण या योजनेची सविस्तर माहिती अर्ज प्रक्रिया अटी शर्ती आणि महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत
mahadbt farmer borewell yojana 2026 योजनेचे उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे SC आणि ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे शेती उत्पादने वाढवणे आर्थिक स्वालंबनला चालना देणे दुष्काळी परिस्थितीत पर्यायी पाणी स्त्रोत निर्माण करणे शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असूनही पाण्याअभावी शेती करता येत नाही त्यामुळे इनवेल बोरिंग नवीन विहीर विहिरीची दुरूस्ती सोलर पंप आदी सुविधांसाठी सरकार आर्थिक मदत साहाय्य दिले जाते
किती अनुदान मिळते
इवेल बोरवेल साठी साधारणपणे 40 हजार ते 50 हजारापर्यंत अनुदान हे अनुदान लाभार्थ्याच्या पात्रता आणि उपलब्ध निधी नुसार दिले जाते लक्षात ठेवा की ही पूर्ण खर्च नसून शासनाकडून दिले जाणारे आर्थिक सहाय्य आहे
कोणत्या बाबीसाठी अनुदान मिळतो
या दोन्ही योजनेअंतर्गत खालील घटकांसाठी मदत मिळू शकते
- इनवेल बोरिंग
- नवीन सिंचन विहीर
- विहीरची दुरुस्ती
- तुषारसिंचन
- शेततळे अस्तरीकरण
- सोलर पंप
- डिझेल पंप
- विज जोडणी
या मध्ये इनवेल बोरिंग हा अलीकडे समाविष्ट केलेला महत्वाचा घटक आहे
पात्रता अटी
mukhyamantri borewell yojana या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता खालील अटी पूर्ण करणे महत्त्वाचे असेल
- अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा SC किंवा अनुसूचित जमाती ST प्रवर्गातील असावी
- अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेतजमीन असावी
- शेतकऱ्याचा फार्मर आयडी असणे अति महत्वाचे आहे
इतर शासन निर्णयानुसार पात्रता तपासली जाईल
borewell yojana 2026 apply online -अर्ज कसा करायचा
mahadbt farmer borewell yojana या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे महाडीबीटी पोर्टल लॉगिन करा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर्स स्कीम पोर्टल वर जावे आपल्या फार्मर आयडीने लॉग इन करावे पासवर्ड टाकून खात्यात प्रवेश करावा घटकासाठी अर्ज करा लोगिन झाल्यानंतर मुख्य पानावर विविध योजना दिसतील घटकासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर विविध विभाग दिसेल
तसे की कृषी यांत्रिकीकरण फलोत्पादन इत्यादी अनुसूचित जाती जमाती विशेष सहाय्य योजना निवडा यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती साठी विशेष सहाय्य योजना हा पर्याय निवडा तालुका व गाव निवडा जमिनीत असेल तपासा फार्मर आयडी आपोआप दिसेल बोरिंग निवडा मुख्य घटकांमधून इनवेल बोअरिंग हा पर्याय निवडा अटी व शर्ती स्वाचा पूर्वसंमती (Declaration) घ्या जतन करा वर क्लिक करा अर्ज सादर करा बाब जतन झाल्यानंतर अर्जदाराचा अर्ज सादर करा व क्लिक करा निवडलेला घटक तपासा पुन्हा अटी मान्य करून अर्ज सबमिट करा
अर्ज फी किती आहे अर्ज सादर करताना 23.60 रुपये ऑनलाईन फी भरावी लागते जर या आर्थिक वर्षात यापूर्वी अर्जदारांसाठी फी भरली असेल तर पुन्हा फी भरण्याची गरज नसू शकते अन्यथा पेमेंट करणे आवश्यक आहे पेमेंट साठी पर्याय नेट बँकिंग यूपीआय क्यू आर कोड स्कॅन पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्याचा संदेश दिसतो
लॉटरी प्रक्रिया कशी असते
अर्ज सादर केल्यानंतर सर्व अर्जाची संगणकीय लॉटरी काढली जाते निवड झालेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाते निधी उपलब्ध दे नुसार पुढील प्रक्रिया केली जाते लॉटरी लागल्यानंतर काम सुरू करण्यासाठी पूर्वसंमती दिली जाते काम कधी सुरू करावे महत्त्वाची सूचना शासनाची पूर्वसंमती मिळाल्याशिवाय काम सुरू करू नये स्वतःहून बोरवेल केल्यास अनुदान मिळणार नाही पूर्व संमती मिळाल्यानंतर बोरवेल बोरिंग चे काम पूर्ण करा संबंधित बिल चलन जतन करा पोर्टलवर अपलोड करा तपासणी पूर्ण झाल्यानंतर अनुदान रक्कम खात्यात जमा केली जाते
आवश्यक कागदपत्रे
साधारणपणे खालील कागदपत्राची आवश्यकता असते
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- सातबारा उतारा
- बँक पासबुक प्रत
- जमीन कागदपत्रे बिल व चलन (अधिकृत सूचना पोर्टलवर तपासाव्या )
mahadbt farmer borewell yojana योजनेचे फायदे
आर्थिक मदत मिळाल्यामुळे बोरवेल खर्च कमी होतो सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे उत्पादन वाढते दुष्काळ परिस्थिती टिकवणे शक्य होते शासनाचा उत्पन्न दर सुधारतो
निष्कर्ष महाराष्ट्र शासनाकडून एस सी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच कृषी स्वावलंबन योजना आणि बिसार मुंडा कृषी क्रांती योजना या अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत विशेष इनवेल बोरिंगसाठी 40 ते 50 हजार रुपये चे अनुदान ही मोठी मदत ठरू शकते ज्या शेतकऱ्यांना बोरवेल करण्याची गरज आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर वेळेत अर्ज भरून घेऊ या योजनेचा लाभ घ्यावा शासनाच्या अटी शर्ती पाळून आणि पूर्वसंमती त्यानंतरच काम सुरू करावे योग्य माहिती आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेमुळे शेती अधिक सक्षम आणि शाश्वत होऊ शकते
अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा





