वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी मंजूर करायची नुकसान – भरपाई किती?अर्ज कसा करावा संपूर्ण मार्गदर्शक

महाराष्ट्र राज्यात अनेक भागांमध्ये वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे रब्बी पिके तसेच फळबाग विशेष नारळ सुपारी आंबा संत्रा मोसंबी केळी यासारख्या प्रमुख पिकांवर वन्यप्राण्यांचा मोठा परिणाम दिसू शकतो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतो वन्यप्राण्यांमुळे झालेले पिकांच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई मिळते का? किती मिळते?अर्जकसा करायचा या लेखामध्ये आपण वन विभागा मार्फत दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई ची संपूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया कागदपत्रे आणि महत्त्वाच्या अटी याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत

वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळते का?

महाराष्ट्र वन विभाग मार्फत वन्य प्राण्यांमुळे शेती पिके फळबाग किंवा उसाचे नुकसान झाल्यास शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते यासाठी स्वतंत्र आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवली जाते राज्य शासनाच्या नियमानुसार अर्ज केल्यानंतर 30 दिवसाच्या आत नुकसानभरपाई देण्याचे निर्देश आहे यासंदर्भात 19 मार्च 2018 रोजी शासन परिपत्रकही जारी करण्यात आले आहे जेणेकरून त्यांना विलंब न होता मदत मिळावी

कोणत्या पिकासाठी मिळते नुकसान भरपाई

वन्यप्राण्यांमुळे खालील पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते

  • फळबाग
  • सुपारी
  • केळी (240 प्रति झाड)
  • कलमी आंबा (वयानुसार इतर फळझाडे)
  • संत्रा
  • मोसंबी
  • शेती पिके रब्बी खरीप इ.
  • गहू
  • हरभरा
  • ज्वारी
  • बाजरी
  • खरीप पिके

नुकसान भरपाई किती मिळते

फळझाडांसाठी भरपाई

  1. केळीसाठी (240 प्रति झाड)
  2. कलमी आंबा( 5 वर्षे पेक्षा जुने झाड) सुमारे 6 हजार प्रति झाड
  3. इतर फळझाडे (5 वर्षावरील) 1 हजार प्रति झाड
  4. संत्रा मोसंबी (5 वर्षाच्या वरील) सुमारे 4 हजार प्रति झाड

नारळ आणि सुपारी साठी ही वयानुसार प्रति झाड दर निश्चित केलेले आहेत शासनाने अलिकडेच काही फळबागा च्या भरपाई दरात वाढ केली आहे

शेती पिकांसाठी भरपाई

10 हजारापर्यंत नुकसान झाल्यास किमान एक हजार दहा हजार पेक्षा जास्त नुकसान असल्यास 1 नुकसानीच्या 80 टक्के रक्कम कमाल मर्यादा 25 हजार उसासाठी भरपाई 800 प्रति मेट्रिक टन कामाला मर्यादा 25 हजार

application for wildlife अर्ज किती दिवसात करावा

नुकसान झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असेल वेळेत अर्ज केल्यास भरपाई मिळण्यात अडचणी येऊ शकतात

अर्ज प्रक्रिया कशी असते

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने केला जातो हा अर्ज RTS (Right to Service ) प्रणालीअंतर्गत सादर केला जातो अर्ज करताना भरण्याची माहिती मोबाईल नंबर,आधार क्रमांक, नुकसानीचा प्रकार, पिक/ ऊस फळझाड कोणत्या वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले उदाहरण हत्ती रानडुक्कर माकड पिकांचे नाव जिल्हा तालुका संबंधित फॉरेस्ट किंवा डिव्हिजन किंवा वाईल्ड लाईफ विभाग गावाचे नाव घट तारीख

पंचनामा प्रक्रिया

अर्ज सादर केल्यानंतर संबंधित वनपाल कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्यामार्फत घटनास्थळी पंचनामा केला जातो तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारण 23 दिवसाच्या आत मंजुरी प्रक्रिया पूर्ण करून नुकसानभरपाई देण्यात येते

बँक DBT साठी आवश्यक

नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात dbt Direct Benefit Transfer पद्धतीने जमा केली जाते त्यासाठी खालील माहिती आवश्यक असेल

बँकेचे नाव खातेदाराचे नाव खाते क्रमांक आयएफसी कोड व्हेरिफिकेशन आवश्यक

आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करणे आवश्यक

बँक पासबुक आधार कार्ड संबंधित शेतजमिनीचा ताजा सातबारा उतारा ई पीक पाहणी केली त्याचा पुरावा प्रमाणपत्र डाऊनलोड करून भरून स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक महत्त्वाची ही पीक पाहणी केलेले असणे आणि ज्या पिकांची ई पीक पाहणी नोंदवलेली नाहीत या पिकांसाठी भरपाई मिळत नाही

अर्ज सबमिट केल्यानंतर काय करावे

अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्या अर्ज क्रमांक त्यानंतर RTS ट्रॅकरमधून (Application status) अर्जाची स्थिती तपासा या अर्ज क्रमांक टाकून ट्रॅक वर क्लिक केल्यावर संपूर्ण माहिती पाहता येते

नुकसान भरपाई मिळण्याची वेळ मर्यादा राज्य शासनाच्या आदेशानुसार अर्ज केल्यापासून 30 दिवसाच्या आत नुकसान भरपाई लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे विलंब टाळण्यासाठी शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

  • 1) वन्य प्राण्यांमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते का? होय रब्बी खरीप तसेच इतर हंगामी पिकांसाठी भरपाई दिली जाते
  • 2)अर्ज ऑफलाइन करता येतो का? नाही सध्या अर्ज प्रक्रिया त्याने ऑनलाइन आहे
  • 3)अर्ज उशिरा केल्यास काय होते? तीन दिवसाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे उशिरा अर्ज केल्यास मंजुरी मिळण्यास अडचण येऊ शकते
  • 4) ई- पाहणे आवश्यक आहे का होय -ई पीक पाहणी अनिवार्य असेल

निष्कर्ष महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते रब्बी पिके ऊस यासारख्या स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत नुकसान झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असेल कागदपत्रे अपलोड करणे आणि इ -पीक पाहणी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक असेल तर योग्य माहिती आणि वेळेत अर्ज केल्यास 30 दिवसाच्या आत नुकसान भरपाई मिळू शकते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया समजून घेऊन योग्य पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे

Leave a Comment