विदर्भ मराठवाडा दूध विकास प्रकल्प टप्पा 2 : 19 जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू |शेतकऱ्यांसाठी मोठे अनुदान

राज्यातील पशुपालनासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे शासनाने विदर्भ मराठवाडा दूध विकास प्रकल्प टप्पा 2 ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यास मंजुरी दिली आहे आणि यासाठी चे अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने सुरू राहिले आहेत या योजनेचा उद्देश दूध वाढवणे पशुपालन व्यवसाय मजबूत करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे योजनेअंतर्गत राज्यातील 19 जिल्हे 192 तालुके आणि 24, 657 गावांमध्ये विविध घटक राबवले जात असून शेतकऱ्यांना 50% ते 100% अनुदान मिळणार आहे चला तर मग या योजनेची सोप्या भाषेत संपूर्ण माहिती जाणून घेऊया

योजना कोणासाठी आहे (पात्रता)

विदर्भ आणि मराठवाडा भागातील दूध व्यवसाय करणाऱ्या किंवा पशुपालन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ही योजना आहे

  • महाराष्ट्रातील विदर्भ किंवा मराठवाडा विभागातील रहिवाशी शेतकरी
  • पशुपालक आधार लिंक मोबाइल नंबर
  • बँक खाते व 7/12
  • अर्जदाराकडे जनवारी असणे हा (काही घटकासाठी)
ही पात्रता पूर्ण करणारी करणारे सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात 

योजनेची उद्दिष्टे

या योजनेत मुख्य हेतू म्हणजेच दुग्ध उत्पादन वाढवणे पशुपालनाचे गुणवत्ता सुधारणे उत्पादन वाढवणे आधुनिक दुग्ध व्यवसाय पद्धतीचा अवलंब करणे शेतकऱ्याचे उत्पन्न स्थिर करणे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळ विचार करता ही योजना येथे मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे

योजने अंतर्गत मिळणारे अनुदान (मुख्य घटक)

सरकारने या योजने अंतर्गत एकूण काही प्रमुख बाबी राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान ठेवला आहे सोप्या भाषेत खालील प्रमाणे

उच्च उत्पादन क्षमता काय म्हशी वाटप 50% अनुदान

शेतकऱ्यांना उच्च दूध देणाऱ्या गाई म्हशी मिळतील यामुळे लगेच दूध उत्पादन वाढ होईल

सुधारित जातीच्या कालवडी 75 टक्के अनुदान

उच्च दर्जाच्या पशुपालनासाठी घटक फार उपयुक्त आहे भविष्यात अधिक दूध देणारी गायीची निर्मिती होते

प्रजनन पूरक खाद्य 25% अनुदान

यामुळे गाई-म्हशी प्रजनन दर सुधारतो व जनवारी हल्दी राहतात

दुधाची फॅट व SNF वाढवण्या साठी पूरक खाद्य 25 टक्के अनुदान

यामुळे दुधाची गुणवत्ता वाढते आणि बाजारात चांगला भाव मिळतो

बहुवार्षिक चारा पिकासाठी 4,000 100% अनुदान

प्रत्येक लाभार्थ्यांना यावर्षी 4000 पूर्ण अनुदान यामुळे वर्षभर चारा सहज उपलब्ध होतो विद्युत चलित्र कडबा कुट्टी 50% अनुदान

शेतकऱ्यांना पशुखाद्य साठवण्यासाठी उपयुक्त उपकरण

शेतकऱ्यांना मुरघास प्रति किलो ₹3 अनुदान दुष्काळ जाणाऱ्यांसाठी उत्तम खाद्य हे घटक सध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शेतकऱ्यांना जनावरे खाद्य चारा उपकरणे आणि प्रशिक्षण या सर्व गोष्टीवर शासनाची मोठी मदत मिळते

अर्ज प्रक्रिया ( online apply)

या योजनेतील सर्व अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातात सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पोर्टल उपलब्ध करून दिली आहे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टलवर जाऊन शेतकरी नोंदणी (farmer registration) हा पर्याय निवडावा लागतो नोंदणी करताना आधार क्रमांक टाकून (OTP verification) ओटीपी व्हेरिफिकेशन ओटीपी पाताळणी झाल्यानंतर शेतकऱ्याने आपली प्रोफाईल तयार करून आवश्यक वैयक्तिक शेती आणि संबंधित माहिती भरावी प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला योजनेतील हवा असलेला घटक निवडता येतो प्रत्येक घटकासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे स्कॅन करून घ्यावे लागतात सर्व माहिती अचूक पणे भरल्यानंतर अर्ज सबमिट केला जातो अर्ज केल्यानंतर त्यांची उपस्थिती शेतकरी आपल्या लोगिन मध्ये जाऊन Application status या विभागात पाहू शकतो येथे अर्ज प्रलंबित पातळीमध्ये किंवा मंजूर झाला आहे का हे दिसते तसेच सध्या कोणतेही अर्ज सुरू आहेत याची माहिती पोर्टलवर उपलब्ध असते

सध्याच्या अपडेट नुसार खालील घटकांसाठी अर्ज सुरू

बहुवार्षिक चारा पिकांसाठी 4 हजार अनुदान

उच्च उत्पादन क्षमता गाई म्हशी वाटप कडबाकुट्टी यंत्र मुरघास वाटप

इतर घटकांना काही दिवसात सुरू होणार आहे

शेतकऱ्यांना मिळणारा थेट फायदा

ही योजना निवड अनुदानावर आधारित नाही तर संपूर्ण दूध व्यवसाय सुधारण्याची संधी आहे दुग्ध उत्पादन वाढेल व दुधाची गुणवत्ता वाढेल तसेच जनावरे निरोगी राहतील चारा संकट कमी होईल आणि पशुपालनात आधुनिकता येईल शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत दुष्काळी भागात स्थिर व्यवसाय निर्माण विदर्भ आणि मराठवाडा या भागांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे

निष्कर्ष : विदर्भ मराठवाडा दूध विकास प्रकल्प टप्पा 2 योजना शेतकरी आणि पशुपालनासाठी मोठी संधी आहे 50% ते 100% अनुदानावर जनावरे चारा खाद्य उपकरणे देऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा शासनाचा उद्देश आहे अर्ज vmddp.com वर सुरू असून पात्र सर्व शेतकऱ्यांनी लवकर अर्ज करणे फायद्याचे ठरेल

Leave a Comment