राज्यातील गरज व आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध घरकुल योजना राबवल्या जात आहेत त्यापैकी यशवंत राव चव्हाण मुक्त वारसात घरकुल योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेद्वारे बेघर व पात्र लाभार्थ्यांना पक्के घर उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे
yashwantrao chavan mukta vasahat yojana या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांसाठी नुकतीच एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे आर्थिक वर्ष 2023- 24 आणि 2024-25 मध्ये विविध जिल्ह्यांमधील अनेक लाभार्थी या योजनेसाठी पात्र आले होते मात्र काही लाभार्थ्याचे दुसरे व तिसरे हप्ते तसेच प्रलंबित अनुदान वितरण बाकी होते या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निधी वितरणास मंजूर मोठा दिलासा दिला आहे शासनाच्या या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना आपल्या घराच्या बांधकामासाठी आवश्यक आर्थिक मदत वेळेत मिळणार आहे
शासन निर्णयानुसार 2023 -24 या आर्थिक वर्षात जालना यवतमाळ, धाराशिव, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, सांगली, जळगाव, आणि लातूर या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अमरावती, कोल्हापूर, चंद्रपूर-गडचिरोली, छत्रपती संभाजी नगर, परभणी, जालना, बीड, बुलढाणा, यवतमाळ, लातूर, वर्धा, वाशिम, सोलापूर, आणि हिंगोली या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना निधी वितरणासाठी मान्यता देण्यात आली आहे
yashwantrao chavan mukta vasahat yojana या योजनेकरिता राज्य शासनाने एकूण 20 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे या निधीच्या माध्यमातून पात्र लाभार्थी प्रलंबित हप्ते आदा केले जाणार आहे असून घरकुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी मदत होणार आहे अनेक लाभार्थ्याचे बांधकाम निधी अभावी अर्धवट अवस्थेत होते आता या निधीमुळे त्यांना आर्थिक बळ मिळणार असून लवकरच त्यांची घराचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना ही समाजातील वंचित व बेघर घटकांसाठी महत्त्वाची ठरली आहे
ग्रामीण व शहरी भागातील पात्र कुटुंबांना सुरक्षित आणि सामान जनक निवासस्थान उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे शासनाच्या त्या पूर्ण प्रयत्नांमुळे या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे या संदर्भातील शासन निर्णय अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्या आहे
इच्छुक लाभार्थ्यांनी आणि नागरिकांनी gr.gov.in तसेच GR. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संबंधित शासन निर्णय पाहू शकतात शासन निर्णयामध्ये निधी वितरणाची सविस्तर माहिती जिल्हानिहाय तपशील आणि इतर आवश्यक बाबी करण्यात आले आहेत एकूणच राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहेत घरकुलाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे येत्या काळातही अशाच प्रकारे योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊन सर्व गरजू सुरक्षित निवारा मिळावा हीच अपेक्षा आहे





