राज्यात सप्टेंबर ऑक्टोंबर 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती या गोष्टीमुळे शेती पिका सोबतच शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य साधन यापैकी असलेले विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अनेक ठिकाणी पुराचे पाणी थेट विहिरीमध्ये शिरल्याने गाळ सासणे विहीर कोसळणे विहीर बुजणे किंवा पूर्णपणे निकामी होणे अशा स्वरूपाचे नुकसान झाले होते या गंभीर परिस्थितीचा दखल घेत शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसान भरपाई पॅकेज जाहीर केले या पॅकेज अंतर्गत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक पात्र विहिरीसाठी .30,000 ची आर्थिक मदत देण्याची निर्णय घेण्यात आला
पंचनामे व अर्ज प्रक्रिया
नुकसान झालेल्या विहिरीचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले तपासणी व छाननी नंतर एकूण 11 हजार 813 विहिरी या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आल्या असून त्यांना अनुदान देण्यासाठी शासनाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे
पहिल्या टप्प्यात 15,000 रूपये अनुदान
नोव्हेंबर 2025 मध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता या निधीतून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येक 15 हजार रुपयाचे अनुदान देण्यात सुरुवात करण्यात आली आणि अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा देखील झाले आहे मात्र काही लाभार्थ्यांचे अनुदान वितरण अजून प्रलंबित आहे
लाभार्थी याद्या प्रकाशित
दरम्यान या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आहे सध्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत यासंबंधी जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत
शेतकऱ्यांनी खालील संकेतस्थळावर भेट देऊन लाभार्थी यादी पाहू शकतात
- सोलापूर जिल्हा. solapur.gov.in
- सांगली जिल्हा. sangli.gov.in
या संकेतस्थळावर Announcements/ Notices विभागामध्ये विहिरीच्या नुकसानीसाठी पात्र लाभार्थी यादी या शीर्षकाखाली याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या याद्या तालुकानिहाय तसेच शेतकऱ्यांच्या नावानुसार उपलब्ध आहेत
इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
लातूर, बीड, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड, सोलापूर, सांगली राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या सर्व जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या लाभार्थी याद्या टप्प्याटप्प्याने प्रकाशित केल्या जात आहेत त्यामुळे उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नियमित आपल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर माहिती तपासावी
दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 15 हजार रुपये
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण 30 हजार रुपयाची मदत 2 टप्प्यात दिली जाणार आहे त्यात पंधरा हजार रुपये देण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यातील 15 हजार रुपये अनुदान हे विहिरीच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर किंवा काम प्रत्यक्षात पाहणी पूर्ण झाल्यानंतर वितरित केले जाणार आहे यासंदर्भात शासनाकडून चे नवीन निर्णय किंवा अपडेट्स जाहीर होतील त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे
ही माहिती आवडल्यास नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा





