जय शिवराय मित्रांनो राज्यात खरीप हंगाम 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अत्यंत दिलासादायक असा महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर केला आहे राज्य शासनाच्या निर्णयानुसार विहीर दुरुस्ती चा पहिला हप्ता अनुदान मंजूर करून निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात येत आहे
खरीप 2025 अतिवृष्टी पूर नुकसान विहिरीसाठी विशेष पॅकेज
अतिवृष्टी पुराचे पाणी व गाळ साचल्यामुळे अनेक सिंचन विहिरी खचलेल्या अथवा बंद पडल्या होत्या या परिस्थितीचा आढावा घेत राज्य शासनाने एक विशेष पॅकेज जाहीर केले होते त्यानुसार प्रति विहीर 30 हजार इतके अनुदान देण्याची तरतूद पंचनामे झालेल्या विहिरीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान पात्र शेतकर्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित करण्याचा निर्णय
11813 शेतकऱ्यांना पहिला टप्पा अनुदान
पंचनामे आणि प्राप्त अर्जाच्या तपासणीनंतर एकूण 11813 विहीर नुकसान ग्रस्त असलेलेचे स्पष्ट झाले असून या सर्व शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर करण्यात आला आहे
पहिल्या टप्प्यात खालील प्रमाणे : अनुदान रक्कम अनुदानाच्या 50% प्रत्येक शेतकऱ्याला पंधरा हजार एकूण मंजूर निधी 18 कोटी 56 लाख रुपये
विभागीय मंजूर निधी
शासनाने वितरीत केलेल्या निधी खालील प्रमाणे आहे
| विभाग | मंजूर निधी |
| कोकण विभाग | ₹13 लाख |
| नाशिक विभाग | ₹4 कोटी 53लाख |
| पुणे विभाग | ₹2 कोटी 50 लाख |
| छत्रपती संभाजी नगर विभाग | ₹8 कोटी |
| अमरावती विभाग | ₹2 कोटी 90 लाख |
| नागपूर विभाग | ₹50 लाख |
एकूण -18 कोटी 56 लाख मंजूर
शेतकऱ्यांना अनुदान कसे दिले जाणार
- पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम स्वरूपात 15,000 थेट जमा
- उर्वरित हप्ता नंतरच्या टप्प्यात वितरित
- ही रक्कम केवळ पंचनामे झालेल्या आणि अधिकारी अधिकृतपणे पात्र या शेतकर्यांनाच दिली जाणार
शासनाचा जीआर कुठे पाहावा
शासनाचा अधिकृत जीआर तुम्ही खालील संकेतस्थळावर पाहू शकता Maharashtra.gov.in
निष्कर्ष : अतिवृष्टी व पुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे विहीर दुरुस्तीमुळे त्या हंगामात सिंचन व्यवस्था मध्ये सुधारणा होण्याची मोठी अपेक्षा आहे जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर पहिल्या टप्प्यातील रक्कम लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल





