ujjwala gas kyc update online : प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतील KYC ची महत्वाची माहिती

मित्रांनो देशभरातील गरीब महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना वार्षिक 3 सिलेंडर 14.2 किलो पर्यंत प्रत्येक सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी दिली जाते ही सबसिडी महिलांसाठी गॅस वापरण्याचे वजे हलके करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे

परंतु सबसिडी मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी योजनेअंतर्गत केवायसी (KYC) पूर्ण करणे अनिवार्य सर्व गॅस कंपन्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पुन्हा एकदा आव्हान करण्यात आले आहे की 31 मार्च 2026 पर्यंत आपली केवायसी पूर्ण करावी जर ही केवायसी पूर्ण केली नाही तर या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी सबसिडी थांबू शकते

लाभार्थ्यांची संख्या

देशभरात सध्या जवळजवळ 10 कोटी 55 लाखापेक्षा जास्त महिला या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत महाराष्ट्रामध्ये या योजनेअंतर्गत 55 अधिक महिला लाभार्थी आहे नवीन कनेक्शन मध्ये सुद्धा 25 लाख नवीन गॅस कनेक्शन दिले जात आहेत आणि त्यातीलच जवळजवळ 20 लाख महिला लाभार्थ्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत यामुळे स्पष्ट होते की ही योजना एक मोठी जनहिताच्या योजना आहे जेथे लाभार्थ्यांना वेळोवेळी सबसिडी मिळत राहण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे

ujjwala gas kyc करण्याची आवश्यकता

योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी लाभार्थ्यांनी केवायसी करणे बंधनकारक आहे अनेक महिला लाभार्थ्यांना त्यांच्या गॅस एजन्सी कडून जसे की इंडियन गॅस, एलपीजी गॅस केवायसी साठी कॉल येत आहेत परंतु काही लाभार्थ्यांकडून या कॉलला दुर्लक्ष केले जाते जर 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी पूर्ण केले नाही तर योजनेअंतर्गत सबसिडी मिळवणे बंद होऊ शकते

घरबसल्या केवायसी कशी करावी ?

सौभाग्यनि केवायसी आता घरबसल्या सुद्धा करता येते खालील मार्गदर्शक वापरून आपण सहजपणे आपल्या केवायसी पूर्ण करू शकत

फेस आधार KYC जर आपल्याकडे स्मार्टफोन असेल तर संबंधित गॅस कंपनीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करा

  • इंडियन गॅस साठी Indian Gas App
  • भारत गॅस साठी Bharat Gas App
  • एलपीजी गॅस साठी LPG Gas portal/App

याद्वारे आपण फेस स्कॅनिंग करून आपली केवायसी पूर्ण करू शकता

  • डिस्ट्रिब्युटरकडे जाऊन केवायसी

जर ॲपवरून केवायसी करणे शक्य नसेल तर आपल्या स्थानिक गॅस डिस्ट्रिब्युटरकडे भेट द्या फेस स्कॅन करून केवायसी पूर्ण करू शकता ही प्रक्रिया फक्त दोन ते पाच मिनिटांमध्ये पूर्ण करता येते

सबसिडी ची माहिती

केवायसी पूर्ण (ujjwala gas kyc update online) केल्यानंतर योजनेअंतर्गत सबसिडी थेट आपल्या बँक खात्यात जमा केली जाते सबसिडीच्या रकमेला नियमितपणे तपासण्यासाठी आपल्याला आपले खाते आणि सबसिडी स्टेटस पाहता येईल सबसिडीच्या रकमेची माहिती आणि अर्ज प्रक्रिया बाबतची सर्व माहिती योजनेच्या ॲप ॲप किंवा पोर्टलवर दिलेली आहे

लाभार्थ्यांना दिले जाणारे इतर फायदे

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत केवळ सबसिडी नाही तर महिला लाभार्थ्यांना इतर फायदे देखील मिळते त्यात घरातील स्वच्छ इंधनाचा वापर धूर कमी होणे आणि आरोग्याची सुधारणा वेळोवेळी गॅस सिलेंडरची सुविधा योजना ग्रामीण तसेच शहरी भागातील गोरगरीब महिलांसाठी विशेष लाभ लाभदायक आहे

लक्षात ठेवण्यासारखे गोष्टी

  1. केवायसी तारीख : 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे
  2. कॉल्स कडे दुर्लक्ष करू नका एजन्सीकडून येणाऱ्या केवायसी कॉल्स कडे दुर्लक्ष केल्यास सबसिडी थांबू शकते
  3. सोपी प्रक्रिया मोबाईल ॲप किंवा डिस्ट्रीब्यूटर द्वारे सहजपणे पूर्ण करा
  4. सबसिडीचे खात्री : केवायसी नंतर आपली सबसिडी थेट बँक खात्यात जमा होते

निष्कर्ष मित्रांनो प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना आपल्या घरातील स्वच्छ ऊर्जा वापरासाठी आणि आर्थिक मदतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मात्र सबसिडीची सुविधा मिळवण्यासाठी केवायसी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे 31 मार्च 2026 पर्यंत kyc न केल्यास लाभार्थ्यांचे सबसिडी येणे थांबेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरबसल्या किंवा आणि गॅस एजन्सी कडे जाऊन केवायसी पूर्ण करणे हे आपल्या हातात आहे चला आजच आपल्या केवायसी पूर्ण करून आपण या महत्वाच्या योजनेचा लाभ सुरू ठेवूया

Leave a Comment