आजच्या काळामध्ये अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास ठेवतात मात्र भांडवली ची कमतरता हा मोठा अडथळा त्यांना उद्भवतो महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि उद्यमशीलतेला चालना देणे हा भारत सरकार आणि राज्य सरकारचा प्रमुख उद्देश आहे या उद्देशाने सरकारने सुरू करण्यात आलेल्या योजनांपैकी उद्यामी योजना 2025 (udyogini scheme) महिलांसाठी मोठी आर्थिक मदत करते ही योजना नवीन नाही पण गेल्या काही वर्षात तिचा विस्तार अधिक वाढविण्यात आला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सहकार्याने आज देशभरातील महिला या योजना अंतर्गत कोणत्याही प्रकारची गॅरंटी न देता तारण मुक्त कर्ज सहज मिळू शकतात
उद्योगिनी योजना काय आहेत? | Udyogini Scheme Details in Marathi
उद्योग आणि योजनेची सुरुवात सर्वप्रथम कर्नाटक सरकारने केली होती या उपक्रमाचा उद्देश म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना लघु व सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी अधिक आधार देणे आज ही योजना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सहकार्याने संपूर्ण भारतात कार्यरत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1 लाख ते 3 लाख पर्यंत चे तारण मुक्त (Collateral Free Loan) कर्ज वितरित केले जाते या कर्जाच्या मदतीने महिलांनी खालील प्रमाणे व्यवसाय सुरू करू शकतात
- ब्युटीपार्लर
- शिलाई / बुटीक
- किराणा दुकान
- डेअरी/ पशुपालन
- होम बेस्ट उत्पादन व्यवसाय
- फुड प्रोसेसिंग
- छोटे ट्रेडिंग युनिट इत्यादी
उद्योगिनी योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजेच कर्ज घेण्यासाठी कोणतीही मालमत्ता सोने किंवा हमी दर हे देण्याची कोणतीही गरज नाही
उद्योगिनी योजना 2025 चे प्रमुख फायदे
महिलांसाठी तारण मुक्त व्यवसाय कर्ज
सहज आणि जलद मंजुरी प्रक्रिया
व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्राधान्य
ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात लागू विधवा आणि दिव्यांग महिलांसाठी सवलती
कुटुंबाचे कमी उत्पन्न असलेल्या महिलांना आर्थिक मदत
लघु व्यवसायिकांना प्रोत्साहन मिळून रोजगार निर्मिती
काय आहे पात्रता? | Udyogini Scheme Eligibility
उद्योगिनी योजनेत अर्ज करण्यासाठी सरकारने काही मूलभूत पात्रता निकष ठेवले आहेत वयाची अट
- अर्जदार महिला : 18 ते 25 वर्षे वयोगटातील असावी
- उत्पन्नाची मर्यादा : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे
- मात्र विधवा आणि दिव्यांग महिलांसाठी उत्पन्न मर्यादा लागू नाही
- कर्ज इतिहास : अर्जदार महिलेने यापूर्वी कोणते बँक कर्जत थकबाकी धारक
- नसावी
- भारतीय नागरिकत्व : भारतीय नागरिक असावी आणि तिच्या नावे ओळखपत्र असणे आवश्यक
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- उद्योगिनी योजनेत कर्ज मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचा दाखला (Income Certiflcata)
- व्यवसाय योजना ( Business plan)
- जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
- शैक्षणिक किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास)
- बँक पासबुक खाते तपशील व्यवसाय योजनेत तुम्हाला व्यवसायाचा प्रकार खर्च अंदाजीत नफा मार्केटिंग योजने याचे त्यातली कागदपत्रे द्यावे लागते
उद्योगिनी योजना कर्ज कुठे मिळते
उद्योगांनी योजनेत अंतर्गत कर्ज देशातील आणि सरकारी आणि खाजगी बँका देतात
स्टेट बँक ऑफ इंडिया SBI
बँक ऑफ बडोदा
कॅनरा बँक
पंजाब नॅशनल बँक
इंडियन बँक
IDBI, ICICI, HDFC
ग्रामीण बँक
सहकारी बँक
अर्ज कसा करावा? | Udyogini Scheme Apply Online
उद्योगिनी योजनेत अर्ज करणे खूप सोपे आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया myscheme. gov.in वरील वेबसाईट उघडा सर्च बार मध्ये उद्योगिनी योजना शोधा तुमच्या राज्यातील उपलब्ध योजना निवडा पात्रता तपासा ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करा अर्जातील हाताळणी झाल्यानंतर तुमच्याशी बँक संपर्क करते आणि अर्ज प्रक्रिया सुरू होते
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
(बँकेतून) जवळच्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जा उद्योगिनी योजना कर्जासाठी अर्ज सर्व कागदपत्रांसह फार्म भरा तुमची व्यवसाय योजना सादर करा बँक पात्रं करून कर्ज मंजूर करते
उद्योगिनी योजनेअंतर्गत कर्जावर व्याज दर किती
व्याजदर बँक बदलतो साधारण महिलांसाठी 8 % ते 12 % दरम्यान असतो काही राज्यांमध्ये स्वतःचे विशेष सबसिडी कार्यक्रम असल्याने व्याज दर कमी मिळू शकतो
कोणते व्यवसाय सर्वात लाभदायी ठरतात
उद्योगिनी योजनेतून घेतलेल्या कर्जातून महिला खालील फायदेशीर व्यवसाय सुरू करू शकत
- ब्युटीपार्लर आणि मेकअप स्टुडिओ
- शिलाई मशीन
- पापड लोणचे
- मसाले उत्पादन
- डेअरी व्यवसाय
- मेणबत्ती अगरबत्ती उत्पादन
- किराणा दुकान
- मोबाईल रिपेरिंग
- फुलाचा व्यवसाय
- ऑनलाइन होम बेस्ट व्यवसाय
- याच्यामध्ये खर्च कमी आणि नफा जास्त मिळवण्याची शक्यता जास्त असते
जेष्ठ नागरिक कार्ड 2025 आरोग्य,प्रवास,बँकींग व कायदेशीर मदत सर्व सुविधा एका कार्डमध्ये
नुकसान भरपाई GR आणि यादी 2025 : सरकारचा मोठा निर्णय व 253 तालुक्यांना मदत पॅकेज जाहीर
अतिवृष्टी पूर ग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय 26 नोवेंबर 2025
उद्योग योजना 2025 : महिलांसाठी मोठी संधी
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे स्वावलंबन बनवणे आणि समाजात त्याची ओळख निर्माण करणे हा उद्योगिनी योजनेमागील मुख्य उद्देश आहे अल्प उत्पादन गटातील महिलांना सुरुवातीची भांडवल उपलब्ध करून देऊन सरकार त्यांचा उद्योजकाकडे वळवत आहे जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर आर्थिक अडचणीत येत असेल तर उद्योग योजना तुमच्यासाठी मोठी मदत करू शकते
निष्कर्ष : उद्योगिनी योजना ही देशातील महिलांसाठी सर्वात उपयुक्त आणि परिणाम कारक कर्ज योजना मानली जाते कमी कागदपत्रे तारण मुक्त कर्ज कमी व्याजदर आणि जलद प्रक्रिया यामुळे लाखो महिलांना या योजनेचा लाभ घेत स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे





