वर्धा जिल्ह्यात अनुसूचित जाती नवबौद्ध महिला बचत गटांसाठी 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर योजना 20 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज

समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महिला बचत गटांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या 90% अनुदानावरील ट्रॅक्टर योजनेसाठी वर्धा जिल्ह्यात अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

बचत गट ट्रॅक्टर योजना या योजनेअंतर्गत पात्र महिला बचत गटाकडून 20 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत अशी माहिती समाज कल्याण विभाग वर्धा यांनी दिली आहे ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असून राज्यातील अनुसूचित व नवबौद्ध घटकातील महिलांच्या स्वावलंबन रोजगाराला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे

90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर व उपसाधने

शेतकरी बचत गट या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर ट्रॉली तसेच ट्रॅक्टर साठी लागणारे विविध उपसाधने 90 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात या योजनेतील एकूण प्रकल्प खर्चाची कमाल मर्यादा 50 हजार रुपये निश्चित करण्यात आले असून त्यापैकी 3 लाख 15 हजार रुपये 90 टक्के अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे उर्वरित 10 टक्के म्हणजेच 35000 रुपये संबंधित बचत गटाने स्वतः भरावे लागणार आहे

tractor anudan yojana maharashtra पात्रतेच्या अटी स्पष्ट

mahila tractor yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा गट नोंदणीकृत महिला बचत गट असणे आवश्यक आहे तसेच बचत गटातील किमान 80 टक्के महिला सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे बंधनकारक आहे यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला बचत गट यावेळी पात्र ठरणार नाही असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

कोणती साधने मिळणार

योजनेअंतर्गत 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर तसेच त्यासोबत लागणारे शेतीचे उपसाधने दिले जाणार आहे त्यामुळे शेती कामामध्ये यांत्रिकीकरण वाढवून महिला बचत गटांना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे

अनुदान वितरणाची प्रक्रिया

ट्रॅक्टर व अवजारे खरेदी करताना अनुदानाची 50% रक्कम प्रथम टप्प्यात देण्यात येईल त्यानंतर ट्रॅक्टर याची आरटीओ नोंदणी पूर्ण झाल्यानंतर व आवश्यक प्रक्रिया पार पाडल्यानंतर उर्वरित 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे बचत गटांना गटात 10% हिस्सा म्हणजेच 35 हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट संबंधित जिल्ह्याच्या Assistant Commissioner, Social welfare याच्या नावे काढावा लागणार आहे

आवश्यक कागदपत्रे

अर्ज सादर करताना बचत गट नोंदणी प्रमाणपत्र बचत गट बँक खात्याचे पासबुक आधार कार्ड सलग्न कागदपत्र सदस्यांची जात प्रमाणपत्र तसेच समाजकल्याण विभागात यांनी नमूद केलेले इतर कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत

वर्धा जिल्ह्यात संधी

यापूर्वी नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी प्रक्रिया राबवण्यात आली होती या पाठोपाठ आता वर्धा जिल्ह्यात ही संधी उपलब्ध झाली आहे त्यामुळे पात्र महिला बचत गटांनी दिलेली मुदतीत सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहेत इतर जिल्ह्यांमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यास याबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे

Leave a Comment