खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामध्ये जास्तीत जास्त सोयाबीन व कापुस या दोन्ही पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली दिसत आहे व शेतकऱ्यांना अनुदान मिळेल अपेक्षित होते शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार असे जाहीर करण्यात आलेले होते व त्यानंतर अनुदान देण्याबाबत मोठे पाऊल उचलले जात आहे
व शेतकऱ्यांच्या खात्यात काही दिवसात अनुदान वितरित केले जाणार आहे याची तारीख फिक्स झाली आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे दिले जाणार आहे अनुदान 2 हेक्टर च्या मर्यादित मध्ये दिले जाईल म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचे दोन हेक्टर कापूस असल्यास पीक त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये मिळेल तसेच सोयाबीन एक दोन हेक्टर असल्यास तर सोयाबीन साठी दहा हजार रुपये अशाप्रकारे हेक्टरी पाच हजार रुपये व दोन हेक्टरी च्या मर्यादित अनुदान दिले जाणार आहे
शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे येत्या 26 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केली जाणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असे अनुदान मिळेल 4194 कोटी रुपयांचा निधी यासाठी लागला आहे व राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती अर्थातथ या शेतकर्यांच्या सातबारावर कापूस व सोयाबीन पिकाची नोंद असेल अशा शेतकऱ्यांचे पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान मिळणार आहे व हे अनुदान 26 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे