शेतकरी रेशन अनुदानाबाबत महत्त्वाच्या अपडेट्स पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात

Shetkari ration anudan : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या रेशन ऐवजी दिले जाणारे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे विशेषता मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकरी या अनुदानाची वाट पाहत होते काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा असले तरी अनेक शेतकऱ्यांना अनुदान कमी आले तर काहींच्या खात्यात अजूनही रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे अनुदान नेमका कोणाला मिळते किती मिळते आणि कोणत्या खात्यात जमा होते

(शिधापत्रिका अनुदान) याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे राज्य शासनाने मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना अन्न धान्याऐवजी रोख रक्कम अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत रेशन कार्ड मधील प्रति लाभार्थी 170 रुपये इतके अनुदान देण्यात येते या 14 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे अमरावती विभागातील जिल्हे तसेच नागपूर भागातील वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे या अनुदानासाठी शेतकऱ्यांना अर्ज करणे बंधनकारक होते ज्या शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज केले आहे आणि ज्यांच्या कुटुंबातील लाभार्थी केवायसी पूर्ण झाली आहेत

अशा आधार संलग्न लाभार्थ्यांना ही अनुदान दिले जात आहे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे अनुदान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते मात्र अजूनही अनेक लाभार्थी या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते शासनाने 31 डिसेंबर 2025 ही केवायसी करण्याची अंतिम तारीख दिली आहे होती ज्या लाभार्थ्यांनी या तारखेपूर्वी केवायसी पूर्ण केली आहे याचे अनुदान एक जानेवारीपासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेत एक महत्त्वाची बाब म्हणजे बहुतांश रेशन कार्ड वर महिला कुटुंब प्रमुख करतां असतात त्यामुळे हे अनुदान थेट त्या महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा केले जाते अनेक वेळा रेशन कार्ड वर नाव असले तरी पैसे स्वतःच्या खात्यात येत नाहीत ते कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यात जमा होतात त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा गैरसमज होतो

अनुदान न मिळण्यामागे काही प्रमुख असू शकतात

  • कुटुंब प्रमुख महिलेचे बँक खाते बंद असणे
  • खात्याची केवायसी पूर्ण करणे आधार लिंक नसणे किंवा एनपीसीआय मॅपिंग योग्य प्रकारे न झालेली असणे
  • ही मुख्य कारणे आहेत त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी सलग्न आहे का खाते सक्रिय आहे का आणि केवायसी पूर्ण आहे का हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे
  • तसेच रेशन कार्डची केवायसी झाली आहे का हेही तपासावे रेशन कार्ड साठी मेरा रेशन ॲप फेस आधार आर डी ॲप किंवा जवळच्या स्वतः स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून केवायसी करता येते
  • जर एखाद्या शेतकऱ्याचे बंद झाले असेल किंवा त्याने या अनुदानासाठी अर्ज केला नसेल तर सर्वप्रथम नवीन अर्ज करणे आवश्यक आहे
  • अर्ज मंजूर झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल

शेवटी शेतकऱ्यांनी आपल्या अनुदान किती जमा झाले आहे हे ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात या योजनेबाबत वेळोवेळी अपडेट येत आहेत त्यामुळे योग्य माहिती घेऊन आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून केल्यास शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ नक्कीच मिळू शकते

Leave a Comment