महाराष्ट्र राज्य मधील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना पेन्शन योजना दिव्यांग लाभार्थी योजना याच बरोबर वृद्धापकाळात योजना या योजने मधील लाखो लाभार्थ्यांना साठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आले आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर लाभार्थ्यांना आता नवीन स्टेटस ट्रेकिंग ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे या नवीन सुविधेमुळे लाभार्थ्यांना आता त्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही हा नेमक्या कोणत्या दिवशी जमा होणार त्याचबरोबर अर्जाची सध्याची स्थिती काय आहे याची माहिती घरबसल्या सहजपणे तपासता येणार आहे
नवीन ट्रेकिंग ऑप्शन का महत्वाचे असते
पूर्वी अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या पेन्शनचा हप्ता जमा झाला की नाही हे जाणून घेण्याकरता बँक मध्ये जावे लागत असे आता संबंधित कार्यालयात चौकशी करावी लागत असे परंतु आता शासनाने नवीन प्रक्रिया अधिक सोपी केली आहे नवीन ऑप्शन मुळे खालील माहिती ऑनलाइन उपलब्ध होते सध्याची स्थिती आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही बिल जनरेट झाले आहे का पेमेंट जमा स्थिती आता जमा झाल्याची तारीख यामुळे लाभार्थ्यांचा वेळ व खर्च दोन्ही वाचणारा आहे
अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झालेले दोन ऑप्शन
सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरती आता लाभार्थ्यांनी करिता दोन वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध आहेत लाभार्थी स्थिती (Beneficiary status) या ऑप्शनमध्ये लाभार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन नंबर मिळवता येतो Beneficiary status Track on scheme हा नवीन ऑप्शन असून त्यात लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची सविस्तर माहिती पाहता येते
नवीन स्टेटस कसे पहावे
लाभार्थी खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात
सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे Beneficiary status किंवा स्थिती पहा या पर्यावरती क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाकून घ्या त्यानंतर कॅप्टचा कोड OTP Verify करा तुमचा Registration/ Application Number मिळवा आता नवीन Beneficiary status Track on scheme ऑप्शन निवडा Application Number टाका Search बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल
स्टेटस तपासल्यानंतर कोणती माहिती दिसणार
Search बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील माहिती दिसेल
- योजनेचे नाव
- अर्जाचे नाव
- रजिस्ट्रेशन नंबर
- अर्जाची स्थिती
- आधार प्रमाणीकरण स्थिती
- बिल जनरेट स्थिती डिस्पर्समेट स्थिती
- हप्ता जमा झाल्याची तारीख ही सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या पेन्शन बाबत संपूर्ण मार्गदर्शक माहिती मिळते
कोणत्या लाभार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध असेल
- सध्या खालील योजनेमधील लाभार्थ्यांना ही सुविधा सुरू असणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना,
- विधवा पेंशन योजना, दिव्यांग लाभार्थी योजना, पेन्शन योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
- लवकरच इतर योजनेसाठी हा अर्ज पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे
- लाभार्थ्यांनी काय लक्ष ठेवण्यात यावे
- स्टेटस तपासताना खालील गोष्टी लक्षात ठेवावे आधार क्रमांक योग्य टाकावा
- OTP verification पूर्ण करा Application Number सुरक्षित जतन करून ठेवा चुकीची माहिती भरल्या स्टेटस दिसणार नाही योग्य माहिती भरल्यास तुम्हाला संपूर्ण तपशील दिसेल
शासनाचा हा निर्णय लाभार्थ्यांना करता फायदेशीर
राज्य शासनाने सुरू केलेली ही ऑनलाईन सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असून या लाभार्थ्यांना त्यांच्या पेन्शन हप्त्या बाबत कोणतीही शंका राहणार नाही तसेच आजची स्थिती कधीही आणि कुठेही तपासता येणार असल्याचे मुळे अधिक व पारदर्शकपणे पूर्ण होईल
निष्कर्ष
जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना किंवा वृद्धापकाळ, पेन्शन योजना, विधवा पेंशन योजनेचे लाभार्थी असाल तर लगेच अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे स्टेटस तपासा व हप्ता जमा झाला की नाही याची खात्री करून तुम्ही ही सुविधा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल






