ई- समृद्धी पोर्टलवर सोयाबीन नोंदणी कशी करावी अगदी सोप्या पद्धतीत मार्गदर्शन

राज्यात सध्या सोयाबीनचे दर हे बाजारात हमी भावापेक्षा कमी मिळत आहे त्यामुळे अनेक शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करत आहे राज्य सरकारने जवळपास 550 शेतकरी केंद्रांना परवानगी दिली असून नाफेडने 450 केंद्र सुरू केले आहेत 15 नोव्हेंबरपासून सोयाबीनची खरेदी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे या लेखातून आपण अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल वरून ई समृद्धी पोर्टल नोंदणी कशीची ते समजून घेणार आहोत

ई समृद्धी पोर्टलवर वर नोंदणी साठी लागणारे ॲप्स

मोबाईलवरून नोंदणी करण्यासाठी 2 ॲप्स इन्स्टॉल करणे आवश्यक आहे

  1. E- Samruddhi app
  2. Aadhaar Face RD app (आधार चेहरा प्रामाणिकरण)

नोंदणी प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप

ॲप डाऊनलोड करा आपल्या मोबाईल मध्ये प्लेस्टोर उघडा समृद्धी असे सर्च करून इन्स्टॉल करा नंतर Aadhaar Face RD हे ॲप इन्स्टॉल करून ठेवा ई समृद्धी ॲप ओपन करा भाषा निवडा मोबाईल नंबर टाका आणि सबमिट करा ओटीपी निवडा आणि आलेला OTP टाका नोंदणी मेनू निवडा ओटीपी टाकल्यानंतर स्क्रीनवर काय खालील पर्याय दिसतील

  • तात्पुरती नोंदणी
  • नोंदणी
  • बँकेचा तपशील
  • नॉमिनी
  • योजनेत सहभाग
  • अर्ज स्थिती

यामध्ये नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करा

  • आधार प्रमाणीकरण

आधार क्रमांक टाका दोन ऑप्शन दिसतील

  • Face Authentication
  • Fingerprint Authentication

बहुतेकाकडे मशीन नसण्याने Fingerprint Authentication निवडा

कॅमेरा ओपन होईल चेहरा कॅमेरा नीट दाखवा सेकंदात आधार तपशील स्क्रीनवर येईल

  • आधार कार्ड अपलोड करा : सहाय्यक दस्तावेज वर क्लिक करा गॅलरी मधून आधाराचा फोटो निवडा किंवा कॅमेर्‍याने फोटो काढा अपलोड करा आधार तपशील बरोबर असल्याची खात्री करावी

बँक तपशील भरा : खातेदार एक नाव IFSC कोड टाकल्यावर (ऑटो बँक नाव दिसेल) बँक खाते क्रमांक पासबुक चा फोटो अपलोड करा माहिती सेव करा

योजनेचा सहभाग निवडा : PSS Soybean Procurement Kharif 2025 जिल्हा तालुका गाव दिसेल सर्वे नंबर खाते नंबर व जमीन तपशील दिसेल तुमचीच आहे ना याची खात्री करा टिक मार्क करा आणि सबमिट करा

जमीन नोंदणी आणि क्षेत्रफळ : सातबारा चा फोटो अपलोड करा क्षेत्र किंवा आहे ते टाका (हेक्‍टरी एकरी) माहिती पूर्ण करून पुन्हा सबमिट करा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर अर्ज आयडी दिसेल शेतकरी नोंदणी यशस्वी अशी नोटिफिकेशन येईल नंतर नोंदणीचे पीडीएफ ( PDF) डाऊनलोड करून शकता हा PDF खरेदी केंद्रात उपयोगी पडतो

हमी 2025 : या वर्षी सोयाबीन हमीभाव 5,328 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव कमी असले शेतकऱ्याचा हमीभाव केंद्राकडे ओढा वाढत आहे नोंदणीची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2025 पर्यंत

शेवटचे शब्द: ई- समृद्धी पोर्टल वर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करणे अगदी सोपे आहे फक्त दोन ॲप्स डाऊनलोड करा आणि आधार फेस प्रमाणीकरण करून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा हमीभावाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी नक्की करावी (तुम्हाला समजले नाही तर व्हिडिओ पहा)

Leave a Comment