महिना 100 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या ग्राहकांसाठी स्वर ऊर्जा प्रकल्पात 15 हजाराची बचत महिनाभराच्या नव्या टेंडरला मंजुरी

100 युनिट पर्यंत वीज वापरत असलेल्या दारिद्र रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांसाठी सौर ऊर्जा च्या माध्यमातून मोठी आर्थिक बचत करण्याची संधी उपलब्ध झाली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महावितरण ने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी काढलेल्या नाव टेंडर मुळे प्रति किलो वॅट सुमारे 15 हजार रुपयांची बचत होणार आहे त्यामुळे राज्यातील सुमारे पाच लाख लहान वीज ग्राहकांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे

महावितरणने मागितलेल्या ट्रंडर नुसार एक किलो वॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे 45 हजार 450 निश्चित करण्यात आले आहे सध्या बाजारात सौर ऊर्जा पुरवठादार व्यवसायिक ग्राहकांकडून प्रति किलो रेट सुमारे 60 हजार रुपये आकारत आहेत या तुलनेत नव्या ट्रेंडर दर जवळपास 15,000 नी कमी आहे त्यामुळे सामान्य घरगुती ग्राहकांना स्वर ऊर्जा प्रकल्प बसवताना मोठा दिलासा मिळणार आहे

महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्मार्ट योजनेअंतर्गत या टेंडरला मंजुरी देण्यात आली या बैठकीला अपर मुख्य सचिव आभा शुक्ला उपस्थित होत्या बैठकीत सौर ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि परवडणारी भर देण्यात आला आहे नव्या ट्रेंडमुळे प्रतिकिलो 50 हजार रुपये खर्च गृहीत धरला असला तरी प्रत्यक्षात मंजुर दर 45 हजार 50 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे त्यामुळे ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दरात सौर प्रकल्प उभारण्यात उपलब्ध होणार आहे

ही योजना विशेष कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना आणि वाढत्या वीज बिलामुळे आर्थिक ताण सहन करणाऱ्या कुटुंबासाठी लाभदायक ठरणार आहे घरगुती ग्राहकांना सौर ऊर्जा उभारण्यासाठी शासनाकडून थेट अनुदानही दिले जाते 1 किलो वॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी 30 हजार रुपये 2 किलो वॅट साठी 60 हजार रुपये आणि 3 किलो वॅट साठी 78 हजार रुपये उपलब्ध आहे उर्वरित रक्कम ग्राहकाने स्वतः करायचे असते उदाहरणार्थ 1 किलोवॅट प्रकल्पाची किंमत सुमारे 45 हजार 450 रुपये असल्यास त्यावर 30 हजार रुपये अनुदान मिळाल्यानंतर ग्राहकाला केवळ सुमारे 15 हजार रुपयांच्या आसपास खर्च करावा लागतो त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प सर्वसामान्याच्या आवाक्यात येत आहेत 1 किलो वॅट क्षमतेच्या स्वर प्रकल्पातून सुमारे 120 युनिट वीजनिर्मिती होते

महिना 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही निर्मिती पुरेशी ठरते परिणामी अशा ग्राहकांची वीज बिल शून्यावर येऊ शकते याशिवाय जर अतिरिक्त वीज निर्मिती झाली तर ती महावितरणला विकून ग्राहकाला अतिरिक्त उत्पादन मिळू शकते नेट मीटरिंग च्या सुविधेमुळे वापरलेल्या आणि निर्मिती विजेचा हिशोब ठेवला जातो सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणालाही मोठा फायदा होतो कोळशावर आधारित वीज निर्मिती मुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सर्व अर्जाचा हा प्रभावी पर्याय मानला जातो घरगुती पातळीवर सौर ऊर्जेचा वापर वाढल्यास राज्याच्या एकूण ऊर्जा घरजावरचा ताण कमी होऊ शकतो तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील वीज पुरवठा अधिक स्थिर आणि शाश्वत होण्यास मदत होते

स्मार्ट योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या सौर ऊर्जा क्षेत्रात स्पर्धात्मक दर निर्माण होण्याची शक्यता आहे मोठ्याप्रमाणावर प्रकल्प राबविल्याने करणाच्या खरेदीत सवलतीत मिळू शकते आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना होतो प्रशासनाच्या मते या निर्णयामुळे राज्यातील लहान वीज ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळेल स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल अधिक वेगाने होईल एकूणच कमी दारातील टेंडर थेट अनुदान आणि अतिरिक्त वीज ची संधी या तिन्ही बाबी एकत्र असल्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरत आहे महिना 100 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या ग्राहकांनी या संधीचा लाभ घेतल्यास दीर्घकालीन बचत आणि ऊर्जा स्वावलंबी चा पण सध्या होऊ शकते

Leave a Comment