राज्यांमधून काही भागात अवकाळी पावसा साठी पोषक वातावरण आहे मागील दोन दिवसापासून दुपारपर्यंत उन्हाचा तडका आणि दुपारच्या नंतर वादळी पाऊस हजेरी लावत आहे पुढील चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे
विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे अकोला बुलढाणा अमरावती वाशीम यवतमाळ नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी विजा आणि विजेच्या गडगडासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे
मराठवाड्यातही काही भागात पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजी नगर जालना बीड परभणी धाराशिव हिंगोली नांदेड आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र मधील पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आहिल्या नगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस वीज आणि ढगांच्या गडगडाटात वादळी पावसाचा अंदाज आहे
खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज आणि गडगडासह वादळी पावसाचा अंदाज आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे