शेतकरी मित्रांनो पीक पाहाणी ही केवळ एक औपचारिक प्रक्रिया नसून शेतकरी साठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे पिक विमा पीक कर्ज तसेच शासनाच्या विविध कृषी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आणि ई पीक पाहणी अनिवार्य आहे त्यासाठी प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांनी आपली पीक नोंद वेळेत करून घेणे आवश्यक ठरते रब्बी हंगाम 2025-26 साठी ई पीक पाहणी करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली होती
राज्यभरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असली तरी अनेक शेतकरी विविध कारणामुळे इ पीक पाहणी पासून वंचित राहिले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झाला होता की आता मुदत संपल्यानंतर पिक पाहणी करता येईल की नाही यावर शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी काही कारणास्तव राहिलेली आहे त्यांच्यासाठी 25 जानेवारी 2026 ते 6 मार्च 2026 या कालावधीत सहाय्यकाच्या माध्यमातून ई- पीक पाहणी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही आपल्या गावातील किंवा जवळच्या सहाय्यकाशी संपर्क साधून रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करून घेता येणार आहे यामध्ये केवळ हंगामी पिकाचे नव्हे तर फळबाग लागवड, विहिरी बोअरवेल नोंद तसेच इतर शेतीविषयक नोंद देखील या कालावधीत करता येणार आहे शेतकऱ्यांनी पीक पाहाणी एप्लीकेशन द्वारे स्वतःची नोंद झाली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी तसेच गावातील चावडी किंवा संबंधित संकेतस्थळावर गट नंबर सर्वे नंबर किंवा नावाच्या आधारित रब्बी आणि खरीप हंगामातील नोंद तपासता येतात
महत्त्वाचे म्हणजे इ पीक पाहणी झाल्यानंतर ती नोंद सातबारावर दिसून येते कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सर्वात आधी सात-बारावर पीक नोंद असणे आवश्यक असतेत्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी हिताचे आहे ज्या शेतकऱ्यांनी पिक पाहणी राहिलेली आहे त्यांनी 10 मार्च 2026 पूर्वी सहाय्यकाच्या माध्यमातून ती करून घ्यावी योग्य वेळी नोंदणी करून घेतल्यास भविष्यातील आर्थिक लाभ विमा संरक्षण आणि शासनाच्या योजनेचा सहज लाभ मिळू शकतो
शेतकरी मित्रांनो आपली शेती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हक्काचे लाभ मिळवण्यासाठी ई-पिक पाहणी नक्की करून घ्या





