पीव्हीसी पाईपलाईन करण्यासाठी मिळणार 30 हजार रुपये अनुदान | PVC Pipeline Online Application

शेतकऱ्याची जमीन वेगवेगळ्या गट नंबर मध्ये असते अशावेळी विहीर एका गटात असेल तर दुसऱ्या गटातील शेतामध्ये पाणी देणे शक्य होत नाही अशावेळी जेव्हा शेत मोकळे झालेले असते म्हणजेच उन्हाळा अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये PVC Pipeline पाईपलाईन करण्याचे काम करून घेत असतात पीव्हीसी पाईपलाईन सबसिडी संदर्भातील माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जास्तीत जास्त तीस हजार रुपये एवढी सबसिडी मिळते.

PVC Pipeline : ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा अर्ज हा डीबीटी वेब पोर्टलवर शेतकरी बांधव करू शकतात पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी पाईपची आवश्यकता असते आणि पीव्हीसी पाईप महाग असल्याने अनेक शेतकरी बांधव इच्छा असूनही त्याच्या शेतामध्ये पाईपलाईन करू शकत नाहीत तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करत असाल आणि तुम्हाला पीव्हीसी पाईप अनुदान हवे असेल तर त्यासाठी तीस हजार रुपये एवढे अनुदान मिळते.

अर्जदार जास्तीत जास्त 428 मीटर लांबीचे पीव्हीसी पाईप खरेदी करू शकतात म्हणजेच जवळपास 70 पाइप साठी शासनाकडून कडून हे अनुदान मिळते जास्तीत जास्त तीस हजार रुपयापर्यंत हे अनुदान दिले जाते यासाठी महाडीबीटी या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो.

महाडीबीटी या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून द्या कृषी क्रांती योजना अंतर्गत ही अनुदान मिळते अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी पात्रता अशी आहे

(PVC Pipeline) पीव्हीसी पाईपलाईन सबसिडी लाभार्थी पात्रता

  1. लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा
  2. लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे
  3. जमिनीचा सातबारा व आठ उतारा असणे आवश्यक आहे
  4. लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा जी आहे ती दीड लाखाच्या मर्यादेत असावी
  5. जमीन कमीत कमी वीस गुंठे व जास्तीत जास्त सहा हेक्टर पेक्षा जास्त नसावी

एकदा या योजनेसाठी लाभ घेतला की पुढील पाच वर्षे या योजनेसाठी लाभ घेता येणार नाही अशा पद्धतीने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी अनुदान मिळते

तुम्ही देखील पीव्हीसी पाईपलाईन या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून घेऊ शकता आता जाणून घेऊयात की ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी आहे

पाईपलाईन ऑनलाईन अर्ज पद्धत

  • महाडीबीटी या शेतकरी पोर्टलवर लॉगिन करा
  • अर्ज करा या लिंक वरती क्लिक करा
  • सिंचन साधने व सुविधा या पर्यावरण क्लिक करा
  • या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून द्या मुख्य घटक तयार करण्यामध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा
  • बाब चौकटीमध्ये क्लिक करताच विविध पर्याय दिसेल त्यापैकी पाईप हा पर्याय निवडा
  • उपघटक उपघटक या चौकटीवर क्लिक करून पीव्हीसी पाईप हा पर्याय निवडा
  • पाईपची लांबी टाका जास्तीत जास्त 428 एवढी लांबी स्वीकारली जाणार
  • त्यानंतर जतन करा अर्ज सादर करण्याची पद्धत अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करावा
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

तुमच्यासमोर एक टेक्स्ट येईल वाचून घ्या त्यानंतर योजनेसाठी प्राधान्य क्रमांक निवडा योजनेच्या अटी व शर्ती मान्य करा म्हणजेच त्यासमोर दिसत असल्यास चौकटी क्लिक करा आणि अर्ज सादर करण्याची क्लिक करा तुम्ही जर नवीन असाल तर 23.60 एवढे पेमेंट करा पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत दिलेल्या पर्यायामधील एखादा पर्याय वापरून पेमेंट करून द्या अशा पद्धतीने तुम्ही पीव्हीसी पाईप साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता आणि शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतात.

तर अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पाईपलाईन अनुदान पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही PVC Pipeline Yojna पाईपलाईन अनुदानासाठी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकता ज्यामध्ये आपल्याला तीस हजार रुपये एवढे अनुदान मिळू शकते आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचावा जेणेकरून तो देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

Leave a Comment

वेबसाईट
तुमचं ॲड फोटो
अर्ज करा