राज्यातील नियमित पणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात DBT (Direct Beneflt Transfer) पद्धतीने राबवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्यात अनेक शेतकरी प्रामाणिकपणे आपले पीक कर्ज वेळेत भारतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना राबवली जाते
पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना या योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत केसीसी (KCC) धारक शेतकऱ्यांना 4 टक्के व्याज सवलत दिली जाते राज्य शासनामार्फत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते दोन्ही योजना मिळून एक लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी करण्याची तरतूद आहे मात्र प्रत्यक्षात या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी समोर आल्या आहेत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जाते प्रस्ताव पाठवले जातात आणि व्याज सवलतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते परंतु बहुतांश वेळा शेतकऱ्यांकडून पूर्ण व्याज वसूल केले जाते आणि त्यानंतर व्याज सवलतीची रक्कम शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळत नाही
अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी राज्यभरातून प्राप्त होत होत्या दरवर्षी या योजनेसाठी 100 ते 200 कोटी रुपयांची तरतूद देण्यात येते तरी देखील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळत नसल्याने शासनाच्या यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते या पार्श्वभूमीवर आता शासनाने मोठ्या निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे केंद्र शासनाने 2018 पासूनच सर्व अनुदान योजना डीबीटी (DBT) पद्धतीने राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत
पिक विमा योजना विविध अनुदानाचे हेच अलीकडे सुरू झालेली गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना सुद्धा डीबीटी (DBT) च्या माध्यमातून राबविली जात आहे त्याच धर्तीवर आता पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना देखील डीबीटी द्वारे राबविण्याचा प्रस्ताव सहकार विभागामार्फत तयार करण्यात आला आहे या नव्या पद्धतीमुळे व्याज सवलतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे बँक स्तरावर होणाऱ्या विलंब गैरसमज आणि तक्रारींना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे
अर्थात या योजनेचा लाभ फक्त नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वेळेत कर्ज फेडतात मात्र त्यांना पर्यंत अपेक्षित लाभ मिळत नव्हता त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर अन्याय होत होता आता डीबीटी प्रणालीमुळे या प्रामाणिक शेतक-यांना थेट दिलासा मिळणार आहे
Punjarabrao Deshmukh agricultural intereat subsidy scheme ही योजना महाडीबीटी पोर्टल वर आणली जाणारा की स्वतंत्र डीबीटी पोर्टल तयार केले जाणार अर्ज प्रक्रिया कशी असेल तर पात्रतेसाठी अटी काय असतील याबाबत सविस्तर माहिती येत्या काळात स्पष्ट होणार आहे शासनाकडून अधिकृत निर्णय जारी जाहीर होताच शेतकऱ्यांना सर्व अपडेट देण्यात येणारा आहे
तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार लिंकिंग आणि कर्ज परतफेडीची नोंद अद्यावत ठेवावी असे आवाहन करण्यात येत आहे





