पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी मोफत क्रेडिट कार्ड सुविधा- संपूर्ण माहिती

भारत सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत आता स्ट्रीट वेडर्स आणि छोट्या व्यावसायिकांसाठी एक मोठा दिलासा देणारी सुविधा सुरू करण्यात आली आहे या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना करिता पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकतात आणि क्रेडिट कार्ड द्वारे सुरुवातीला दहा हजारापासून ते पुढे वाढत 30 हजारापर्यंत ची लिमिट मिळणार आहे तेही पूर्णपणे मोफत ही सुविधा विशेषता : भाजीविक्रेते, फळविक्रेते, चहा-नाश्ता विक्रेते, हातगाडीवर व्यवसाय करणारे, छोटे दुकानदार यांच्याकरिता फायदेशीर ठरणार आहे

पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड म्हणजे काय

pm svanidhi योजनेअंतर्गत यापूर्वी लाभार्थ्यांना बिनव्याजी किंवा कमी व्याजदरात कर्ज दिले जात होते जे लाभार्थी नियमितपणे कर्ज पेढ्याची कर्जाची परतफेड करत आहेत अशा लोकांसाठी आता या कर्जाचे स्वरूपात क्रेडिट कार्ड सुविधेत करण्यात आली आहे ह्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी किंवा खर्च केल्यानंतर 50 दिवसापर्यंत कोणतेही व्याज न आकारता परतफेड करण्याची मुभा दिली जाते मात्र जर उशिरा पेमेंट झाले तर साधारणता 1.5 % व्याज आकारले जाऊ शकते

क्रेडिट कार्ड चे प्रमुख फायदे

सुरुवातीला (pm svanidhi 10000 loan apply online ) 10 हजाराची लिमिट चांगल्या क्रेडीट रिपोर्टनुसार लिमिट वाढू शकते 30 हजारापर्यंत लाईफ टाईम फ्री कार्ड कोणतेही शुल्क नाही 50 दिवसापर्यंत व्याजमुक्त वापर डिजिटल व्यवहारांसाठी सोयीस्कर व्यवसायासाठी त्वरित निधी उपलब्ध नियमित वापर आणि वेळेवर परतफेड केल्यास भविष्यात बँकांकडून मोठ्या कर्जासाठी ही मार्ग खुला होतो

क्रेडिट कार्ड साठी अर्ज कुठे करायचा how to apply for credit card

क्रेडिट कार्डसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतो यासाठी अधिकृत वेबसाईट आहे वेबसाईट वर गेल्यानंतर खालील पर्याय दिसतात

apply for loan (नवीन कर्जासाठी)

Apply for credit card ( क्रेडिट कार्ड साठी)

ज्यांनी आधी कर्ज घेतले आहे त्यांनी apply for credit card वर क्लिक करायचे आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया

मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी द्वारे वेरिफिकेशन करा आधारकार्ड असल्याची खात्री द्या तुमचे क्षेत्र निवडा महानगरपालिका नगरपालिका किंवा ग्रामीण SRN किंवा LOR नंबर टाका (महानगरपालिका / ग्रामीण सर्वे संदर्भात क्रमांक) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा बँक निवडा Bank of Baroda व इतर बँका उपलब्ध तसेच अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित बँक क्रेडिट कार्ड जारी करते

कोण पात्र आहे

  • पीएम स्वनिधी योजनेचे नोंदणीकृत लाभार्थी
  • ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतलेले आहे
  • नियमित परतफेड करणारे स्ट्रीट वेडर्स

नवीन लाभार्थ्यांना प्रथम कर्ज द्यावे लागेल त्यानंतर पुढे क्रेडिट कार्डची सुविधा मिळते

निष्कर्ष पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे कमी उत्पन्न असलेल्या व्यवसाय वाढवण्यासाठी त्वरित आर्थिक मदत मिळणार आहे विशेष म्हणजे हे कार्ड पूर्णपणे मोफत असून 50 दिवस व्याजमुक्त सुविधा देण्यात आले जर तुम्ही पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी असाल आणि नियमित कर्ज परतफेड करत असाल तर आजच क्रेडिट कार्डसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या

Leave a Comment