रब्बी हंगामात जिल्ह्यातील एक लाख 89 हजार 558 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आपली पिके सुरक्षित केली आहेत तसेच 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा उतरविता येणार आहे तसेच रब्बी हंगामात दोन लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रावर जिल्हा कृषी अधिकारी अध्यक्ष कार्यालयाकडून पेरणी प्रस्तावित करण्यात आले आहे आतापर्यंत 70 टक्के जिल्ह्यात पेरणी झाली यामध्ये सर्वाधिक हरभरा पिकांचा समावेश होतो त्यापाठोपाठ ज्वारी गहू हे पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत
या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे संरक्षण व्हावेत यासाठी 2013 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना आणली आहे योजना रब्बी आणि खरीप हंगामात राबवली जाते त्याचबरोबर यंदा रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील एक लाख 81 हजार 588 शेतकऱ्यांनी दोन लाख 53 हजार 632 हेक्टर क्षेत्रावर हरभरा ज्वारी गहू या पिकाचे विमा कंपनीकडे सुरक्षित केले आहेत त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवून आपली पिके सुरक्षित करावी असे आवाहन जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे
पिक विमा काढलेले शेतकरी
- जिंतूर 47,929
- गारखेड 29,372
- मानवत 18,738
- पालम 32,484
- पाथर्डी 15,456
- परभणी 44,845
- पूर्णा 19,070
- सेलू 24961
- सोनपेठ 13,768
पिक विमा योजनेअंतर्गत मुदतवाढ
तर रब्बी हंगामातील 15 डिसेंबर पर्यंत प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा भरण्यास मदत देण्यात आली आतापर्यंत जिंतूर मधील जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक 33 हजार 689 शेतकऱ्यांनी 47 हजार 929 हेक्टर क्षेत्रावर पिके सुरक्षित केले आहेत
गंगाखेड तालुक्यातील 22हजार 624 शेतकऱ्यांनी 29हजार 372 मानवत 13हजार 21 शेतकऱ्यांनी 18 हजार 738 हेक्टर पालम 25हजार 681 शेतकऱ्यांनी 32 हजार 484 परभणी तालुक्यातील 31हजार 547 शेतकऱ्यांनी 44 हजार 854 हेक्टरवरील गहू ज्वारी हरभरा ही पिके कंपनीकडे सुरक्षित केली आहेत
पाथर्डी तालुक्यातील 11हजार 5 शेतकऱ्यांनी 15हजार 456 पूर्ण 23हजार 686 जणांनी 29 हजार 70हजार सेलू तालुक्यातील 18हजार 151 शेतकऱ्यांनी 24 हजार 961 तर सोनपेठ तालुक्यातील सर्वात कमी दहा हजार 184 शेतकऱ्यांनी 13हजार 768 हेक्टरवरील पिके सुरक्षित केले आहेत