पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी ला मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात साठी परळी व लोणी येथील 75 एकर शासकीय गायरान जमीन मंजूर करण्यात आली आहे या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे परळी वैजनाथ व बारामती येथे नावे पशु वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे
परळीतील पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे यासाठी परळी तालुक्यातील मौजे लोणी व परळी वैजनाथ येथील एकूण 72 एकर शासकीय गायरान जमीन शासनाने मंजूर केली आहे
काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार मोजे लोणी ता परळी वैजनाथ येथील गट क्र 07 मधील 8 हेक्टर 80 आर 22 एकर व मौजे परळी येथील स न 478 मधील 20 हेक्टर 50 एकर अशी एकूण 72 एकर जमीन नवीन पशु वैद्यकीय महाविद्यालय आणि पशु प्रक्षेत्र उभारणीसाठी प्राधान्य करण्यात येणार आहे या संदर्भात शासन मान्यता महसूल व वन विभागाने मंजूर केली आहे
ही जमीन आता पशुसंवर्धन विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे या निर्णयामुळे परळी वैजनाथ बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा भागातील पशुवैद्यकीय शिक्षण व संशोधनाला नवे बळ मिळाले आहे शेतकरी व पशुपालकांना आधुनिक सेवा देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होणार आहे या निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ना पंकजा मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहे