खरीप हंगामापासून एक रुपया मध्ये पिक विमा योजनेला आता मिळालेला पूर्ण विराम आणि निकषात झालेले बदल याचा परिणाम पीक विमा योजनेवर झाला असून नागपूर विभागामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली असून फिरवल्याचे चित्र देखील दिसत आहे खरीप हंगामामध्ये नागपूर विभागातून केवळ 7 लाख 70 हजार 259 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला 2024 मध्ये 15 लाख 56 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केले होते 2020 राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली होती
1 रुपया पिक विमा योजनेत प्रतिकूल हवामान घटकांमुळे पिकांची पेरणी लागवड आणि उगवण न झाल्यामुळे होणारे नुकसान पिकांच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची जास्त होणारे नुकसान आणि पीक पेरणीपासून काढणीपर्यंत च्या कालावधीत पिकाच्या उत्पादनामध्ये येणार मोठ्या प्रमाणात घट स्थानिक नैसर्गिक आणि आपत्ती काढणीपश्चात नुकसान या घटकांचा प्रामुख्याने समावेश होत आहे एक रुपयात पिक विमा असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 3 लाखांवर आणि 2024 मध्ये अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता
या दोन्ही वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि नुकसानभरपाई देताना विमा कंपनीने हातखाली केली हाते वेळोवेळी कारणे समोर करत शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला होता हा मुद्दा आमदार सुधीर मुंगटीवार यांनी उचलून धरला होता मात्र त्यानंतर मोठ्या प्रसाद घेणे शेतकऱ्यांनी पीक विमा देण्यात आला होता मागील वर्षांमध्ये मराठवाडा आणि अन्य भागांमध्ये पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा झाला विधानसभेत हे चांगलेच गाजले होते
तेव्हापासून एक रुपयात पिक विमा योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या मात्र 2025 च्या खरीप हंगामात राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना बंद केली होती त्यात काही बदल करण्यात आले खास करून नव्या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना जास्त चे पैसे मोजावे लागणार होते नव्या पीक विमा योजनेत महत्त्वाचे निकष बदलण्यात आले याचा परिणाम पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे चित्र दिसून आले होते
पिक विमा योजनेत 1 जुलै पासून सुरुवात झाली 31 जुलै 2025 ही विमा काढण्याची शेवटची तारीख त्यानंतर पिक विमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली मात्र तरीही शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नव्हता रब्बी हंगामातही प्रमाण तुटपुंजे होते खरीप हंगामा प्रमाणे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे मात्र रब्बी हंगामात 1493 शेतकऱ्यांनी पिक विमा साठी अर्ज केले त्यापैकी 1013 शेतकऱ्यांनीच पिक विमा काढून पीक संरक्षण केले आहे जिल्ह्यात 3 लाख 51 हजार शेतकरी आहे यंदा एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी कडे पिक विमा चे काम सोपवण्यात आले





