वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवी व पशुधन हानी वाढली; नुकसान भरपाई साठी काय आहे प्रक्रिया?

महाराष्ट्रातील जंगल लगतच्या आणि ग्रामीण भागांमध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे विशेषता वाघ बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, हत्ती, मगर यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व जीवित हानी सहन करावी लागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मानवी तसेच पशुधन हनी साठी ठराविक नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाते मात्र यासाठी योग्य प्रक्रिया आणि कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे

मानवी हानी झाल्यास शासनाची नुकसान भरपाई

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा इजा झाल्यास शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते शासनाने यासाठी ठराविक दर निश्चित केले असून मानवी मृत्यू झाल्यास 25 लाख रुपयांची भरपाई दिली जाते जर हल्ल्यात कायमस्वरूपी अपंगत्व आले असेल तर संबंधित व्यक्ती 7 लाख 50 हजार रुपये तर गंभीर जखमी असल्यास 5 लाख रुपये इतकी मदत मंजूर केली जाते किरकोळ इजा झाल्यास खाजगी रुग्णालयातील प्रत्यक्ष उपचार खर्च किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये यापैकी जो कमी असेल तो खर्च शासनाकडून दिला जातो मात्र यासाठी उपचार खर्चाचे बिले डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे

पशुधन मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

प्राण्याच्या आल्यामुळे पशुधन मृत्यूच्या घटना ही मोठ्या प्रमाणात घडत आहेत वाघ, बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, तरस, कोल्हा, मगर, हत्ती तसेच जंगली कुत्रा यांच्या आल्यामुळे पशुधन धनाचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळते गाय म्हैस किंवा बैल मृत्यू झाल्यास संबंधित शेतकऱ्याला पशूच्या बाजार भावाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 70 टक्के 70 हजार रुपये त्यापैकी जो कमी असेल तो मोबदला दिला जातो आणि शेळी व इतर लहान पशुधन मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या 75 टक्के किंवा कमाल 15 हजार रुपये इतकी भरपाई मंजूर होते पशुचा बाजारभाव स्थानिक चौकशी अधिकृत दर किंवा पशु वैद्यकीय अहवाल याच्या आधारे निश्चित केला जातो

पशुधन जखमी झाल्यास काय मिळते

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशु जखमी झालात पण मृत्यू झाला नसेल तरीही उपचार खर्चाची भरपाई दिली जाते गाय म्हैस किंवा बैल कायमस्वरूपी विकलांग झाल्यास बाजारभावाच्या 50 टक्के किंवा 15000 यापैकी जो कमी असेल तो मोबदला दिला मिळतो सामान्य जखमी च्या बाबतीत उपचारासाठी केलेला खर्च दिला जातो मात्र हा खर्च पशूच्या बाजार भावाच्या 25 टक्‍क्‍यांपर्यंत किंवा जास्तीत 5 हजार रुपये पर्यंत मर्यादित असतो यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणि उपचार बिल सादर करणे आवश्यक आहे

पंचनामा भरपाईचा कणा

वन्यप्राणी आणि भरपाईसाठी पंचनामा हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे मानला जातो घटना घडताच तात्काळ वन विभाग ग्रामसेवक किंवा तलाठी यांना माहिती देणे आवश्यक आहे काही ठिकाणी कृषी अधिकारी किंवा स्थानिक समिती देखील पंचायत सहभागी असते पंचायती मध्ये घटना घडलेली ठिकाण आणि चा प्रकार अंदाजीत वन्य प्राणी नुकसान व्हिडिओ पुरावे आणि साक्षी दारी चे नावे नमूद केली जातात पंचनामा न झाल्यास अनेक वेळा नुकसान भरपाई अडकण्याची शक्यता असते

अर्ज कुठे करायचा

पंचनामा पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने तालुका कृषी कार्यालय किंवा नजदीकच्या वन विभाग कार्यालयात अर्ज सादर करावा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे

आवश्यक कागदपत्रांची यादी

मानवी हानी च्या प्रकरणात अर्ज पंचनामा परत हॉस्पिटल रिपोर्ट उपचार बिले मृत्यू प्रमाणपत्र लाभल्यास ओळख पत्र बँक खाते तसेच आणि काही प्रकरणात पोलीस रिपोर्ट आवश्यक असतो पशुधन हानी च्या बाबतीत अर्ज पंचनामा पशु वैद्यकीय प्रमाणपत्र पशु मालकी पुरावा फोटो आणि तपशील सादर करावे लागतात

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

तज्ञांच्या मते घटना घडल्यास त्वरित माहिती देणे पंचनामा करून घेणे आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित सादर करणे केल्यास नुकसान भरपाई प्रक्रिया सुलभ होते भरपाई मिळण्यास काहीसा कालावधी लागू शकतो मात्र कागदपत्रे अपूर्ण असतील तर शेतकऱ्यांना न्याय मिळतो असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे

Leave a Comment