राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत आठव्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे मोठ्या प्रतीक्षेनंतर आता राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे 89 लाख 75 हजार पात्र शेतकऱ्यांच्या मध्ये 2 हजार रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र अजून काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही यामुळे आपण पात्र आहात का आपला हप्ता जमा झाला का हा हप्ता मंजूर आहे का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने केवळ 2 मिनिटात तपासून शकतात त्यामुळे शासनाने नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टल वर Track One नावाचा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे या लेखामध्ये आपण हप्त्याचे स्टेटस कसे तपासायचे त्याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत
8व्या हप्त्याचे वितरण कधी झाले
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या आठव्या व हप्त्याचे वितरण 23 मार्च 2026 रोजी करण्यात आले आहे या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम लगेच जमा झाली आहे तर काही च्या खात्यामध्ये ती 48 तासाच्या आत जमा होण्याची शक्यता असते जर तुमचा स्टेटस Fund Disbursement असा उल्लेख दिसत असेल तर तुमचा हप्ता शासनाकडून पाठविण्यात आलेला आहे व तो लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल
हप्ता भेटला नाही तर काय करावे
अनेक शेतकरी पात्र असूनही देखील त्यांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे म्हणजे रक्कम जमा झालेली नाही अशा परिस्थितीमध्ये घाबरण्याची गरज नाही
सर्व प्रथम तुम्ही तुमच्या Application status (अर्ज स्थिती) तपासणे आवश्यक आहे शासनाने यासाठी अधिकृत पोर्टल सोपी सुविधा उपलब्ध करून दिली आहे
namo shetkari yojana beneficiary status कसे पाहावे
नमो शेतकरी योजनेचा हप्ता तपासण्या करिता खालील सोपे स्टेप
- सर्व प्रथम नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या अधिकृत
- पोर्टलवर Track One जा या पर्यायावर क्लिक करा
- पुढे तुम्हाला Beneficiary Number / Application number टाकायचा सांगितले जाते
- जर तुमच्याकडे Beneficiary Number नसेल तर Beneficiary status पर्याय क्लिक करा
- त्यानंतर Know Your Registration Number ग्रीन रंगातील पर्याय वर क्लिक करा
- पुढील तुमचा आधार क्रमांक किंवा आधार से लिंक मोबाइल नंबर टाका
- स्क्रीनवर दिसणारा captcha code भरा
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका
- Get Data या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या Registration Number स्क्रीनवर दिसेल
- हा Registration Number कॉपी करून तुम्ही पुन्हा Track One मध्ये टाका
- Search बटणावर क्लिक करा यानंतर तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल
namo shetkari status कोणती माहिती उपलब्ध असते
Track One पर्यावरण स्टेटस तपासल्यानंतर खालील माहिती तुम्हाला दिसते
- लाभार्थ्याचे नाव
- अर्ज क्रमांक
- अर्ज सादर केल्याची तारीख
- पात्रतेची स्थिती Fund Disbursement तारीख
जर येथे Fund Disbursement 23 मार्च अशी तारीख दिसत असेल तर तुमचा हप्ता शासनाकडून पाठवण्यात आलेला आहे
Fund Disbursement दिसत असेल तर पुढे काय करणार
जर तुमचा स्टेटस मध्ये Fund Disbursement दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा हप्ता मंजूर करून तुमच्या खात्यावर पाठवला आहे काही वेळा बँक प्रक्रियेमुळे रक्कम खात्यात जमा होण्यासाठी किमान 24 ते 48 तासाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे अशा परिस्थिती थोडावेळ प्रतीक्षा करावी
Beneficiary Number नंबर नसल्यास काय करू शकतो
अनेक शेतकऱ्यांकडे Beneficiary Number उपलब्ध नसतो अशा वेळी Know Your Registration Number या पर्यायावर वापर करून आधार क्रमांक यांच्या मदतीने Registration Number सहज मिळवता येतो हा नंबर मिळाल्यानंतर Track One मध्ये टाकून स्टेटस तपासता येते
कोण कोणत्या कारणामुळे हप्ता थांबू शकतो
खालील कारणांमुळे काही वेळा शेतकऱ्यांचा हप्ता प्रत्यक्ष थांबू शकतो
- आधार लिंक नसणे
- बँक खाते चुकीचे असणे
- e- kyc पूर्ण नसणे
- अर्जामध्ये त्रुटी असणे
- पात्रता तपासणी अपूर्ण असणे
- अशा परिस्थितीत संबंध माहिती दुरुस्ती केल्यानंतर पुढील हप्ता चा लाभ मिळू शकतो
निष्कर्ष
नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा आठवा हप्ता मोठ्या प्रमाणावर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्यास त्यांनी घाबरण्याची गरज नाही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सुविधेवर केवळ 2 मिनिटात आपल्या अर्जाची आणि हप्त्याची स्थिती ऑनलाईन तपासता येते म्हणजेच सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला Registration Number शोधून Track One द्वारे स्टेटस तपासणी अत्यंत आवश्यक असेल त्यामुळे आपला हप्ता मंजूर झाला की निधी पाठवण्यात आला आहे का किंवा काही त्रुटी आहे का हे सहज स्पष्टपणे समजू शकते





