namo shetkari maha samman nidhi yojana: आठव्या हप्ता बाबत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक बाब समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेच्या आठव्या हात्याची वाट पहात राहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य शासनाने या योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यासाठी तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे राज्यातील पात्र शेतकर्‍यांना लवकरच आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

योजनेचे उद्देश

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (pm Kisan) या योजनेशी संलग्न संपूर्ण स्वरूपात राबवली जाते म्हणजेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदती सोबतच राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक साहाय्य दिले जाते या योजनेमुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात काही प्रमाणामध्ये मदत मिळते बियाणे खते औषधे सिंचन किंवा इतर शेतीच्या गरजा पूर्ण करण्याकरिता रक्कम उपयोगी येते

आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर

डिसेंबर 2025 मध्ये कृषी आयुक्तलया च्या माध्यमातून राज्य शासनाकडे नमो शेतकरी महा सन्मान निधी चा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती या मागणीचा विचार करून राज्य सरकारकडे अखेर 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निर्णयामुळे योजनेच्या माध्यमातून आठव्या हप्त्याचे वितरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे राज्यातील लाखो शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पहात होते आता निधी उपलब्ध झाल्यामुळे या प्रक्रियेला गती मिळणार आहे

किती शेतकरी लाभार्थी

राज्यात सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 90,42,241 पात्र ठरले आहेत या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ देखील दिला जातो त्यामुळे आठव्या हप्त्याच्या लाभातून या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाणार आहे ही मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पारदर्शकता राहते आणि शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतो

हप्ता वितरणाची तारीख लवकरच

राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला असला तरी हप्ता वितरणाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही मात्र लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे शासन स्तरावर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या तर शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाईल राज्यातील अनेक शेतकरी या योजनेवर अवलंबून आहेत त्यामुळे हप्ता वितरणाची तारीख जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे

प्रशासकीय खर्चावर ही निधी

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबवितांना स्वतंत्रपणे प्रशासकीय निधीची तरतूद नसते त्यामुळे अनेक वेळा योजना राबविताना अडचणी येण्याची शक्यता असते याची दखल घेत राज्य शासनाने यावेळी प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे या निर्णयामुळे पुढील काळामध्ये योजना राबवताना किंवा ते वितरित करताना होणारा विलंब कमी होण्याची शक्यता आहे प्रशासनाला आवश्यक असलेल्या आर्थिक साधन उपलब्ध झाल्यामुळे कामकाज अधिक सुरळीतपणे पार पडू शकते

शेतकऱ्यांसाठी योजनेचे महत्व

महाराष्ट्रात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे हवामानातील बदल बाजारातील चढ-उतार उत्पादन खर्च वाढणे अशा अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो अशा परिस्थितीवर सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत शेतकर्‍यांकरिता मोठा आधार ठरते आहे नमो शेतकरी महा सन्मान योजने मुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक सहाय्य मिळते त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेल्या खर्चाचा काही भाग होता येतो विशेष लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते आहे

अधिकृत जीआर कुठे पाहता येईल

या निधीत मंजुरी संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जीआर राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तरी आणि नागरिकांना हा जीआर Maharashtra government official website वर पाहता येईल या संकेतस्थळावर शासनाच्या विविध योजनेचे निर्णय आणि माहिती प्रकाशित केली जाते

निष्कर्ष एकूणच पाहता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर होणे हे राज्यातील लाखो शेतकऱ्यांकरिता मोठे दिलासादायक पाऊल आहे आता शासनाकडून लवकरच वितरणाची तारीख जाहीर होण्याची अपेक्षा आहे या निर्णयामुळे सुमारे 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून हप्त्याच्या कामासाठी त्यांना मोठा आधार मिळेल तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पुढील काळात हप्ते वितरित करताना होणारा विलंब कमी होण्याची शक्यता आहे राज्य सरकारच्या या निर्णयाकडे शेतकरी मोठ्या आशेने पहात आहेत आणि लवकरच यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा आहे करत आहे

📢 महाराष्ट्र तील सर्व सरकारी योजना अपडेट मिळवण्यासाठी सर्वात आधी योजना अपडेट WhatsApp आणि Telegram channel जॉईन करा 🌾 शेतकरी योजना🧑‍🎓 विद्यार्थी योजना 🏠 घरकुल योजना 📢 नवीन सरकारी अपडेट 👉

WhatsApp channel join करा :

महत्त्वाचे सूचना : जर जीआर डायरेक्ट डाऊनलोड होत नसेल तर आमच्या टेलिग्राम तसेच व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा

Telegram चॅनेल

Leave a Comment