कन्यादान योजनेअंतर्गत या समाजातील वधू-वरांना मिळणार 20 हजार रुपये | अर्ज कुठे करावा

आज आपण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी एक योजना जाणून घेणार आहोत ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जात आहे अनेकांना या योजनेची माहिती नसते किंवा अपूर्ण माहिती असते त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून आपण कन्यादान योजना समाविष्ट आणि स्पष्ट शब्दात जाणून घेऊया

कन्यादान योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध समाजातील आर्थिक दृष्ट्या दुरबल कुटुंबांना विवाहासाठी आर्थिक साहाय्य देण्यासाठी कन्यादान योजना राबवली जाते योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात 20 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते पूर्वी आपण दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती पाहिली व आहे मात्र ही योजना दिव्यांग अथवा आधीव्यंग निकषावर आधारित नसून जात व उत्पन्न या निकषावर करीत आहे

mukhyamantri kanyadan yojana 2026 कोणाला मिळतो लाभ?

या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना मिळतो अनुसूचित जातीमध्ये या योजनेचा लाभ मिळतो इतर संबंधित उपजाती चा समावेश होतो म्हणजेच ज्यांच्याकडे अनुसूचित जाती चे अधिकृत पत्र आहे तेच या योजनेसाठी पात्र ठरतात ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे की इतर कोणत्याही प्रवर्गातील नागरिकांना (mukhyamantri kanyadan yojana 2026) या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपली जात अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गात येते का याची खात्री करणे आवश्यक आहे

आर्थिक निकष

या योजनेसाठी अर्जाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे उत्पन्न प्रमाणपत्र अधिकृत प्राधिकरणाकडून काढलेले असावे उत्पन्न मर्यादा पूर्ण न झाल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो

आवश्यक कागदपत्रे कन्यादान योजनेसाठी

  • अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात
  • अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र
  • आधारकार्ड
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • विवाह झाल्याचा फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचा दाखला)
  • बँक पासबुकची प्रत

ही सर्व कागदपत्रे अचूक व अद्यावत असणे आवश्यक असेते कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास अर्ज प्रक्रियेला विलंब होऊ शकतो

mukhyamantri kanya vivah yojana 2026 – अर्ज कसा करावा

मुख्यमंत्री कन्यादान योजना 2026 या योजनेसाठी अर्ज दोन पद्धतीने करता येतो ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असतील तरी अनेक वेळा तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे अर्जदारांनी शक्य असल्यास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे अधिक सोयीचे ठरते अर्जदारांनी आपला अर्ज समाज कल्याण विभागाच्या आयुक्त कार्यालयात सादर करावा तसेच पंचायत समिती मार्फत ही अर्ज स्वीकारले जातात पंचायत समितीकडे अर्ज सादर केल्यास तो संबंधित समाज कल्याण विभागाकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जातो

सामूहिक विवाहासाठी विशेष तरतूद

सामूहिक विवाह सोहळा यांसाठीही विशेष तरतूद आहे अनेक सामाजिक संस्था किंवा वधू वर सूचक संस्था समूह विवाह आयोजित करतात अशा संस्थांना प्रत्येक जोड्या मागे चार हजार रुपये अनुदान दिले जाते त्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना कुटुंबांना कमी खर्चात विवाह सोहळा पार पाडता येतो आणि समाज सामूहिक विवाहाची परंपरा प्रोत्साहन मिळते

थेट लाभ हस्तांतरण (DBT)

या योजनेअंतर्गत मंजूर झालेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्यामुळे कोणतेही मध्यस्थी शिवाय पारदर्शक पद्धतीने लाभ दिला जातो अर्ज करताना बँक खात्याची माहिती अचूक देणे आवश्यक असेल

महत्त्वाची सूचना

  1. अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासावे
  2. उत्पन्न मर्यादा जात निकष पूर्ण होत असल्याची खात्री करा
  3. विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे
  4. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो

निष्कर्ष. कन्यादान योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी अत्यंत उपाय योजना आहे विवाहसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी शासनाकडून मिळणारे 20 हजार रुपये अनुदान हे मोठे सहाय्य ठरू शकते तसेच सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेसाठी योजना प्रोत्साहनपर आहे म्हणूनच पात्र असलेल्या नागरिकांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा योग्य माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रासह अर्ज केल्यास त्या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या योजनेची माहिती पोहोचावी तितकेच महत्त्वाचे आहे

जय हिंद जय महाराष्ट्र

महत्वाच्या अपडेट चुकवू नका- सरकारी योजना नोकरी अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात अधिक मिळवण्यासाठी कृपया All वर क्लिक करा म्हणजेच योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल

Leave a Comment