महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील युवक शेतकरी आणि महिला बचत गटांना स्वावलंबी करण्यासाठी दिनांक 19 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (mukhyamantri gramin pashudhan udyojakta yojana) जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत गाई म्हशी पालन शेळीपालन यासोबत पोल्ट्री व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे या लेखामध्ये आपण पोल्ट्री व्यवसाय करिता या सर्व योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या तीन प्रकारच्या प्रकल्पांची माहिती रक्कम पात्रता अटी कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
पोल्ट्री व्यवसाय करिता उपलब्ध तीन प्रकल्प प्रकार
mukhyamantri gramin pashudhan udyojakta yojana या योजनेअंतर्गत पोल्ट्री व्यवसायासाठी खालील तीन प्रकारच्या प्रकल्पांना अनुदान दिले जातात
- मास उत्पादन साठी
- बॉयलर पोल्ट्री प्रकल्प
- अंडी उत्पादनासाठी
- कुक्कुटपालन प्रकल्प
- अंडी उबवणी केंद्र हॅचेरी इन्क्युबेटर प्रकल्प
महत्त्वाची बाब म्हणजे एक व्यक्ती फक्त एका प्रकारच्या प्रकल्पासाठी अर्ज करू शकतो
अंडे उत्पादनाकरीता कुक्कुटपालन प्रकल्प (Layer farming)
या योजनेत प्रकल्पामध्ये अंडी देणाऱ्या सुधारित कोंबड्यांचे पालन करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जाते त्याची क्षमता या प्रकारात लाभार्थ्याला किमान 5 हजार एक दिवशीय पक्षी खरेदी करा अंडी उत्पादनाचा व्यवसाय सुरू करता येतो
प्रकल्प खर्च या प्रकल्पासाठी एकूण प्रकल्प खर्च सुमारे तीस लाख इतका निश्चित केलेला आहे त्याकरता मध्ये समाविष्ट
- 5 हजार पक्षी खरेदी खर्च 2.50 लाख
- खाद्य खर्च 4.50 लाख
- शेड बांधकाम 15 लाख
- उपकरणे पाणीपुरवठा ऑटोमेशन 6.68 लाख
- 3 KW सोलर सिस्टम ₹1.32 लाख
mukhyamantri gramin pashudhan udyojakta anudan yojana : अनुदान किती मिळणार
सर्वसाधारण प्रवर्ग प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के कामात 15 लाख अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के कमाल 22.50 लाख
अनुदान अशाप्रकारे मिळणार
अनुदान दोन टप्प्यात दिले जातात पहिला टप्पा शेड बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा पक्षी खरेदी पूर्ण झाल्यानंतर
मास उत्पादन करिता पोल्ट्री प्रकल्प Boiler farming
या प्रकल्पामध्ये मांस उत्पादनासाठी कोंबड्यांचे पालन करता येते हा प्रकल्प 3 हजार किंवा 5 हजार पक्षाच्या असतो
प्रकल्प खर्च 3000 पक्षांसाठी एकूण खर्च 12 लाख 5 हजार पक्षांसाठी एकूण खर्च 19 लाख या खर्चामध्ये सामाविष्ट शेड बांधकाम खाद्य उपकरणे सोलर सिस्टम
सर्वसाधारण अनुदान किती मिळेल
सर्वसाधारण प्रवर्ग 3 हजार पक्षासाठी 6 लाख आठ हजार पक्षासाठी 9.50 अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग 3000 पक्षासाठी 5000 पक्षासाठी 14.25 लाख
अनुदान वितरण
या प्रकल्पासाठी देखील अनुदान दोन टप्प्यांत दिले जातात शेड बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 50 टक्के पक्षी खरेदी केल्यानंतर उर्वरित रक्कम 50 टक्के
अंडी उबवणी केंद्र हॅचरी /इनक्यूवेटर प्रकल्प
या प्रकल्पामध्ये अंडी उबवणी केंद्र सुरु करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे प्रकल्प क्षमता
आठवड्याला 1 हजार अंडी उगवणी क्षमता
प्रकल्प खर्च या प्रकल्पासाठी अंदाजे खर्च इन्क्युबेटर मशीन 3 KW सोलर सिस्टम एकूण खर्च 3.40 लाख
अनुदान किती मिळणार
सर्वसाधारण प्रवर्ग 50% अनुदान अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग 75% अनुदान
पात्रता अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आवश्यक आहे
- किमान वीस गुंठे स्वतःची जमीन असणे आवश्यक
- 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडे करार असावा तसेच किमान 2 वर्षाचा कुक्कुटपालनाचा अनुभव असावा
- शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक
लाभार्थी निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य
खालील घटका प्राधान्य दिले जाईल
- सुशिक्षित बेरोजगार
- महिला बचत गट सदस्य
- वन हक्क धारक
- अल्पभूधारक
- अत्याकल्पभूधारक
- आरक्षण महिलांसाठी 50 टक्के
- दिव्यांगांसाठी 5 टक्के
आवश्यक डॉक्युमेंट
अर्ज करताना खालील डॉक्युमेंट आवश्यक असतील
| आधार कार्ड |
| सातबारा उतारा |
| पॅनकार्ड |
| भाडे करार (असल्यास ) |
| अनुभव प्रमाणपत्र परिक्षण प्रमाणपत्र |
| बचत गट प्रमाणपत्र असल्यास |
| UDID प्रमाणपत्र (दिव्यांगांसाठी) |
| बँक कर्ज मंजुरी पत्र (पोल्ट्री प्रकल्पासाठी आवश्यक) |
बँक कर्जा वरती 4% टक्के व्याज सवलत
mukhyamantri gramin pashudhan udyojakta yojana 2026 या योजनेअंतर्गत पोल्ट्री प्रकल्पासाठी बँक कर्ज घेणे आवश्यक असण्याची शक्यता आहे महत्त्वाची उद्योजकता विकास योजनेअंतर्गत 4 टक्के व्याज सवलत कमाल 4 लाख पर्यंत ही सवलत कर्ज परतफेड पूर्ण झाल्यानंतर मिळते
अर्ज प्रक्रिया कशी असणार
या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पोर्टल ना लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया अर्ज केल्यानंतर निवड खालील प्रमाणे होईल प्रधान या क्रमांकानुसार लाभार्थी निवड त्यानंतर Random Selection पद्धत निवडा झाल्यानंतर 1 महिन्यात शेड बांधकाम पूर्ण करणे पुढील एक महिन्यात पक्षी खरेदी करणे वेळेत काम पूर्ण न केल्यास प्राधान्यक्रम मागे जाऊ शकतो
महत्त्व सूचना
या योजनेअंतर्गत लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजेच एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती अर्ज करू शकते यापूर्वी सन्मान योजनेचा लाभ त्याला अर्ज करताना येणार नाही वेळेत प्रकल्प पूर्ण केल्यास आवश्यक आहे
निष्कर्ष mukhyamantri gramin pashudhan udyojakta yojana ग्रामीण भागात शेतकरी युवक आणि महिलांसाठी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी आहे या योजनेअंतर्गत 50 टक्के ते 75 पर्यंत अनुदान उपलब्ध असल्यामुळे कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरु करता येतो जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरु करायचा असल्यास तर ही योजना नक्कीच फायदेशीर ठरू शकते अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद






