राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि मदर डेअरी यांच्या सहकार्याने विदर्भ तील 11 जिल्हे आणि मराठवाडा आठ जिल्हे आणि अशा एकूण 19 जिल्ह्यांमध्ये दूध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहेच मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले
विदर्भ आणि मराठवाड्यात दूध विकास क्षेत्रत उपलब्ध असलेल्या ज्यादा दुधाचे संकलन करणे दुधाळ जनावरांची संख्या वाढवून स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे यापूर्वी 11 जिल्ह्यात पहिला टप्पा राबविण्यात आला आहे आता दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील 11 आणि मराठवाड्यातील 8 अशा सर्व 19 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला
या सर्व 19 जिल्ह्यात उद्योग संकलनाचा ऑप्शन प्लॅन तयार करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली या उपक्रमा अंतर्गत उच्च दूध उत्पादक क्षमतेच्या गाई आणि म्हशीचे व शेतकरी पशुपालकांना वाटप करण्यात येणार आहे तसेच पशुपालकांना गुणवत्तापूर्ण पूरक खाद्य व SNF वर्धक खाद्य पुरवठा केला जाणार आहे या सोबतच बाहूवर्षीक चारा पिकांसाठी विशेष अनुदान विद्युत चलित्र कडबा कुट्टी यंत्र मुरघास आणि दूध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे