राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 त्याचा हप्ता ज्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता अशा महिलांसाठी अखेर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून 20 जानेवारी 2bb0026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 393 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे रखडलेले हप्ते वितरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
हप्ता न मिळाल्यामुळे राज्यभरात असंतोष
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर महिला लाभार्थ्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नव्हता अनेक जिल्ह्यांमध्ये महिला लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय येथे तक्रारी केल्या तर काही ठिकाणी रस्ता रोको सारख्या आंदोलनाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली होती हप्ता न मिळाल्यामुळे महिला आर्थिक अडचणीत सामना करावा लागत होता
अपुरा निधी हे मुख्य कारण
मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात अत्यल्प प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता त्यामुळे केवळ 50 ते 55 टक्के काही 60 टक्क्यांपर्यंत तच महिला लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकला डिसेंबर महिन्यात आहे उपलब्ध निधी वितरित करण्यात आला मात्र शासनाकडून मोठा गाजावाजात हप्ता वितरण झाला अशी माहिती देण्यात आली होती प्रत्यक्षात मात्र मोठ्या संख्येने महिला लाभार्थी हात्या पासून वंचित राहिल्या
अखेर शासनाचा निर्णय 393 कोटी ची मंजुरी
महिलांचा वाढता असंतोष आंदोलनाचा इशारा आणि प्रशासकीय पातळीवर झालेल्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने अखेर सकारात्मक निर्णय घेतला आहे 20 जानेवारी 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 393 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी प्रामुख्याने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी वापरण्यात येणार आहे
हप्ता अद्याप नं आल्यास काय करावे
राज्य शासनाने निधी मंजूर केला असला तरी काही महिलांच्या खात्यात तांत्रिक कारणामुळे हप्ता येण्यास विलंब होऊ शकतो अशा परिस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदणी अत्यंत महत्त्वाचे आहे पोर्टल वर लॉग इन केल्या नंतर तक्रार हा पर्याय उपलब्ध आहे
या ठिकाणी खालील प्रमाणे तक्रारी करता येतात
- स्वतःच्या हप्त्या याबाबत तक्रार
- हप्ता डिसकंटिन्यु झाल्यास तकरा
- आधार क्रमांक चुकीचा असल्यास दुरुस्ती बाबत तक्रार
- स्वच्छेने (Voluntary) योजनेतून बाहेर पाडण्याची नोंद
- इतर लाभार्थ्याबाबत तक्रार (अपात्र लाभार्थी, मूर्त लाभार्थी याबाबत माहिती)
जर तुमचा हप्ता एकदा सुद्धा आला नसेल किंवा सलग काही महिने येत नसेल तर पोर्टलवर तक्रार नोंदवणे आवश्यक आहे यामुळे तुमचा हप्ता का अडकला आहे याचे नेमके कारण तुम्हाला समजेल आणि पुढील कार्यवाही होऊ शकेल
जीआर कुठे उपलब्ध
निर्णय या संदर्भातील शासन निर्णय जीआर (GR) महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सर्व संबंधित माहिती अनेक अधिकृत माध्यमांमध्ये उपलब्ध आहे
महिलांसाठी महत्त्वाचा दिलासा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हा रखडलेला हप्ता मंजूर झाल्याने लाखो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे हप्ता येत्या काही दिवसात संबंधित महिला च्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महिलांमधील नाराजी कमी होईल आणि योजने वरील विषय पुन्हा दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे





