eNews Ticker

मार्केट भाव: हळदीत काहीसे चढ-उतार टोमॅटो मका सोयाबीन तसेच काय आहेत कापूस भाव

टोमॅटो दरामध्ये घसरण

बाजारातील वाढत्या तापमानाबरोबर टोमॅटोच्या दरावरही दबाव वाढत गेला टोमॅटोच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये मोठी घसरण झाली होती बाजारातील आवक वाढत असल्याने व्यापारी सांगताहेत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली दिसत आहे त्यामुळे सध्या बाजारात सरासरी 700 ते 900 रुपयेचा भाव मिळत आहे टोमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरावरहि दबाव दिसू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

हळदीमध्ये चढ-उतार

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

हळदीच्या बाजारात काहीसे चढ – उतार सुरू आहेत बाजारात नव्या मालाची आवक सुरू असून दुसरीकडे मागणीही टिकून आहे मागील हंगामातील शिल्लक स्टॉकही मर्यादित आहे त्यामुळे यंदा उत्पादनात वाढीचा अंदाज असला तरी दर तेजीत दिसत आहेत हळदीला सध्या सरासरी 11 हजार ते 16 हजार रुपये भाव मिळत आहे बाजारातील दर वाढल्यानंतर आवकही वाढल्याची दिसते तर दर कमी झाल्यानंतर आवक मंदावल्याचे दिसते त्यामुळे दर पातळी एका मर्यादित मर्यादीत कमी जास्त होताना दिसत आहे बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

मका दरात दबाव

बाजारामध्ये सध्या रब्बीचा मका विक्रीसाठी येत आहे यंदा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात मका लागवड आणि उत्पादन वाढले होते बाजारातील मक्याची आवकही चांगली आहे त्यामुळे मक्याच्या दरावर काहीसा दबाव आला सध्या मक्याला बाजारात सरासरी 2000 ते 2300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे महत्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांगली आहे मक्याच्या बाजारातील आवक आणखी काही आठवडे टिकून राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे मक्याच्या भावात काहीसे चढ-उतार दिसू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

कापसाची बाजारात घट

कापसाची आवक आठवड्यागणिक कमी होताना दिसत आहे मात्र उद्योगाकडून गरजे प्रमाणे खरेदी होत आहे त्यामुळे कापसाच्या भावात फार मोठी तेजी आत्तापर्यंत दिसली नाही कापसाचे भाव देशातील बहुतांशी बाजारात सध्या 7300 ते 7700 रुपयांच्या दरम्यान दिसताहेत बाजारातील कापूस आवक सध्या 35000 गाठीच्या दरम्यान आहे पुढील दोन आठवड्यात आवक पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो मात्र सीसीआयचा कापूस विक्रीचे दर काय राहतात याकडेही बाजाराचे लक्ष असेल असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले

सोयाबीन मध्ये दबाव

सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार सुरू असले तरी सहसा सरासरी दर पातळी मात्र स्थिर दिसत आहे सोयाबीनची बाजारातील आवक मागील दोन आठवड्यापासून कमी झाली आहे प्रक्रिया प्लांटची सोयाबीन खरेदी ही मागणीत फार मोठी वाढ झालेली दिसत नाही त्यामुळे दर पातळी स्थिर दिसत आहे सोयाबीनला आजही 4200 ते4400 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला भाव मिळत आहे तर प्रक्रिया प्लांट चे भावही 4550 ते4650 रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीनच्या भावातील चढ-उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा