मराठवाड्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात मका पिकाच्या लागवडी बाबत अनिश्चितता वाढत चाललेली असून अनियमित पाऊस आणि उन्हा अभावी मुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून मराठवाड्यामधील आठ जिल्ह्यांमध्ये एकूण 2,56,650 हेक्टरवर क्षेत्रावर लागवडीचे लक्ष ठेवले गेले असताना
19 जून पर्यंत फक्त 98,891 हेक्टर सुमारे 38% टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे जालना छत्रपती संभाजी नगर बीड हिंगोली धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मराठवाडा विभागात यंदा जून महिन्यात 31 टक्के कमी पाऊस झाला आहे या महिन्यात केवळ 70.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे
तर सामान्य सरासरी 102.7 मिमी आहे गेल्या वर्षी याचा कालावधी 158. 1 मिमी पावसाची नोंद झाली होती तर जिल्हा अध्यक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले की मक्का सारखे पीक ओलावा आणि पाण्याला अत्यंत संवेदनशील असते सध्या काही भागात ओलाव्याची तीव्र कमतरता भासत आहे तर मका पिकांवर ताण आहे
मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे लवकरच पाऊस झाला तर पीक वाचवता येऊ शकते देशमुख यांनी पुढे सांगितले की छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये मक्का लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे तर सुमारे 50 हजार हेक्टरवर कापसाच्या ठिकाणी मक्याचे पीक घेतले गेले आहे
कृषी विभाग व हवामान विभाग सतत परिस्थितीचा आढावा घेत असून शेतकऱ्यांना योग्य सल्ला दिला जातो पावसाची उशीराने होणारी सुरुवात आणि वाढत्या वापी अभावामुळे पिकांचे व्यवस्थापन विपरीत ठरत असल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले आहे