karj mafi maharashtra latest news : राज्यातील कर्जमाफी च्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्यातील थकीत पिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी 30 जून पूर्वी केली जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा दिले आहे गेल्या काही दिवसांपासून कर्ज माफी बाबत निर्माण झालेल्या सभ्रमावर त्यामुळे काही अंश पडदा पडण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यात केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 26 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या (shetkari karj mafi maharashtra 2025) थकीत पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी मंजुरी देण्यात आली होती
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना हप्त्यामध्ये परतफेडीची संधी देण्यात येणार होती याच काळात राज्य शासनाच्या सहकार विभागामार्फत एक महत्वाचा शासन निर्णय जीआर जारी करण्यात आला होता या जीआरमध्ये थकित पीक कर्जाची वसुली तसेच कर्ज पुन्हा पुनर्रचनेच मंजुरी देण्यात आली होती केंद्र आणि राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील कर्जमाफी होणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित झाला होता
कर्ज पुनर्रचनेमुळे कर्जमाफीला टाळाटाळ केली जात आहे का? केंद्र व राज्य सरकार वेळ काढून पणा करत आहे का? अशा अनेक शंका शेतकरी वर्गातून व्यक्त होत होत्या या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांकडे पुन्हा एकदा स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली होती या संदर्भात पुढारी या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली त्यांनी सांगितले की थकीत पीक कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाने एक अभ्यास गट समिती नेमली आहे ही समिती कर्जमाफी बाबत सखोल अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आहे महत्त्वाचे म्हणजे हा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिले आहे
या अहवालात कोणतेही (shetkari pik karj mafi) शेतकरी कर्जमाफी साठी पात्र ठरणार? कर्जमाफीचे निकष काय असतील? कोणत्या प्रकारच्या खर्चाचा समावेश केला जाईल याबाबत सविस्तर माहिती असणार आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य शासन निर्णय घेईल आणि त्यानुसार 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रत्यक्षात अमलात आणेल आणली जाईल असे स्पष्ट आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले आहे त्यामुळे कर्जमाफीत बसलेल्या अफवा आणि संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे सध्या चर्चेत असलेली कर्ज पुनर्रचना ही प्रक्रिया तात्पुरती दिलासा साठी असून कर्जमाफीचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला जाणार असल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे
त्यामुळे पुनर्रचनेमुळे (shetkari pik karj mafi) कर्जमाफी रद्द होणार नाही असे संकेत देखील मिळत आहे एकूणच पाहता कृषिमंत्र्यांनी दिलेली ही माहिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी आहे आता सर्वांचे लक्ष एप्रिल मध्ये सादर होणाऱ्या अभ्यास गट समितीच्या अहवालाकडे लागले आहे या अहवालानंतर कर्जमाफीचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार असून पात्र शेतकरी यादी आणि निकष समोर येणार आहे (shetkari pik karj mafi) या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचा अपडेट पुढील काळात समोर येत राहील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या घडामोडीवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत
नवीन माहिती आणि ताज्या अपडेट सह पुन्हा भेटूया धन्यवाद





