Maharashtra Scheme for Persons with Disabilities 2026 : दिव्यांग व्यक्तीसाठी 15000 व्यवसाय सुरू करण्यासाठी आजच अर्ज करा

राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग मार्फत 28 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जीआर जारी करण्यात आला आहे या निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधनसामग्री टूलकिट खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये पर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान विशेष त्या दिव्यांग व्यक्ती साठी आहे ज्यांनी शासन मान्यता संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे ते शक्य होत नाही चला तर मग बघू या योजनेची माहिती सविस्तर जाणून घेऊ

या योजनेचे उद्देश

राज्यातील अनेक दिव्यांग व्यक्ती कुशल मेहनती सक्षम असूनही आर्थिक कमतरतेमुळे स्वयंरोजगार सुरू करू शकत नाही या पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक क्षणात दिव्यांग व्यक्तींना आर्थिक साहाय्य देणे स्वयंरोजगाराला चालना देणे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे त्यांच्या सक्षमीकरणाला बळकटी देणे

ट्रॅक्टर अनुदान योजना 2026

प्रक्रिया उद्योगासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज

राजश्री योजना 2026 ए टू झेड माहिती

आपल्या मोबाईलद्वारे पहा पीक विम्याचे टेटस अगदी काही मिनिटात

योजना अंतर्गत मिळणारे लाभ

कमाल 15 हजारापर्यंत आर्थिक सहाय्य व्यवसायासाठी आवश्यक टूल किट किंवा साधनसामग्री खरेदीसाठी अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी द्वारे रक्कम जमा होते यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शक आणि पाठपुरावा

कोण पात्र आहेत

ही योजना सर्व प्रकारच्या दिव्यांग प्रवर्गासाठी लागू आहे पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे अर्जदाराचे किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे अर्जदाराचे शासन मान्य प्रशिक्षण संस्था किंवा कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण घेतलेली असावी

खालील संस्थेकडून शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र असतील

  • ITI
  • MSCV(D)
  • PMKVY
  • NSDC
  • NULM

कोणत्या व्यवसायासाठी मिळेल अनुदान

लाभार्थ्याने घेतलेल्या परीक्षणानुसार खालील व्यवसायासाठी टूलकिट खरेदीसाठी अनुदान मिळू

  • शकते शिवणकाम ( टेलरींग)
  • हस्तकला
  • संगणक सेवा केंद्र
  • मोबाईल रिपेयरिंग
  • ब्युटीपार्लर
  • इलेक्ट्रॉनिक प्लंबिंग काम
  • इतर प्रशिक्षणाशी संबंधित व्यवसाय

महत्त्वाचे म्हणजे मंजूर झालेले आर्थिक सहाय्य हे केवळ संबंधित व्यवसाय साठी अर्ज करणाऱ्या साधनसामग्री पुरतेच वापरायचे आहे

अर्ज प्रक्रिया : handicapped pension 2026

या योजनेसाठी अर्ज जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी दिव्यांग कल्याण विभाग यांच्या कार्यालयात सादर करायचा आहे अर्जामध्ये द्यायची माहिती अर्जदाराचे पूर्ण नाव पत्ता गाव तालुका जिल्हा जन्मतारीख वय मोबाईल क्रमांक स्थिती (विवाहित/ अविवाहित/ घटस्फोटीत/ विधवा/ विधुर) दिव्यांगत्वाचा प्रकार व टक्केवारी दिव्यांगतत्व प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक आधार क्रमांक शैक्षणिक माहिती प्रस्तावित व्यवसायाची माहिती

आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे विहित नमुन्यात अर्ज आधार कार्ड युनिक डेसिबिलिटी आयडी (UDID) कार्ड रहिवासी दाखला प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो टूल किट खरेदी केल्याचा पुरावा बिल चलन आधार संलग्न बँक खात्याची पासबुक परत सर्व कागदपत्रे स्वतः स्थापित Self attested असावीत

निवड प्रक्रिया कशी होईल

अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयात अर्जाची छाननी केली जाईल पात्र अर्जदारांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे समितीची रचना : मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास सदस्य महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सदस्य जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण अधिकारी सदस्य सचिव समितीच्या शिफारशी व पात्र लाभार्थ्यांचे अंतिम निवड केली जाईल

अनुदान वितरण पद्धत pension for disabled person in maharashtra

पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने थेट अनुदान जमा केले जाईल यामुळे पारदर्शकता राखली जाईल मध्यस्थीची गरज भासणार नाही लाभार्थ्याला थेट लाभ मिळेल व्यवसायाची मागणी व पाठपुरावा अनुदान वितरित झाल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व्यवसायाच्या ठिकाणी भेट देतील लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केला आहे की नाही व्यवसायाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल एक वर्षापर्यंत व्यवसाय सुरळीत चालवा यासाठी मार्गदर्शक केले जाईल प्रत्येक तीन महिन्यांत शासनाला अहवाल सादर केला जाईल वर्षातून दोन वेळा व्यवसायाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल यामुळे केवळ अनुदान देणे नव्हे तर यशस्वी होण्यासाठी ही मदत केली जाईल

अर्जाचा नमुना आणि GR कुठे मिळेल

या योजनेचा अधिक शासन निर्णय जीआर आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता Maharashtra government अधिकृत संकेतस्थळ GR Dot Maharashtra अर्जाचा नमुना संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षम कार्यालयात उपलब्ध आहे

निष्कर्ष दिव्यांग व्यक्ती साठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे आणि उपयुक्त आहे कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग बांधवांना आता आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी उपलब्ध झाली आहे पंधरा हजारापर्यंत चे अनुदान हे छोट्या व्यवसायासाठी मोठी मदत करू शकते विशेषतः ग्रामीण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मोठा फायदा होईल जर आपण किंवा आपल्या ओळखीतील कोणी दिव्यांग व्यक्ती या पात्रते मध्ये बसत असतील तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या योजनेचा लाभ घ्यावा व च्या दिशेने हे एक मोठे पाऊल हे शासनाच्या या उपक्रमामुळे अनेक भारतीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा आहे

अशाच उपयोगी माहितीसाठी व्हाट्सअप जॉईन करा तसेच आपल्या नोटिफिकेशन येणारी All करून टाका

Leave a Comment