राज्यात 23 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी वाऱ्यासह विजाच्या कडकडात पावसाची शक्यता

राज्यामध्ये काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसून येत आहे आज आणि उद्या म्हणजेच गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाचा जोर वाढणार आहे अशाच मग काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पहाटेपासून पुन्हा मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून मुंबईसह पश्चिम उपसागरात आज पहाटेपासून अधून-मधून मुसळधार पाऊस सुरू आहे पश्चिम उपसागरात ढगाळ वातावरण असून मागील अर्ध्या तासापासून अंधेरी जागेश्वरी मालाड गोरेगाव कांदवली बोरिवली दहिसर विलेपार्ले साताकृझ या सर्व परिसरात पाऊस सुरू आहे शुक्रवार पर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच मग पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा मिनिट उशिराने तर हरबल रेल्वेची दहा मिनिटे उशिराने सुरू आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सध्या सुरळीत आहे

राज्यामध्ये सध्या 23 जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान विभागाने वर्तवला अंदाजा अनुसार ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज 7 ऑगस्ट रोजी राज्यातील 23 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे तसेच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह आणि हलक्या ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणात विजेच्या गडगडात पावसाची शक्यता आहे तसेच ठाणे पालघर मुंबई रायगड येथे हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी विजेच्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे

या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुणे घाट मांडा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे छत्रपती संभाजी नगर जालना हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर परभणी बीड हिंगोली नांदेड धाराशिव लातूर येथे आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे

तर उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते पावसाची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव येथे तालुक्यात पावसाची शक्यता आहे अहिल्यानगर मध्येही विजा सह आणि वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली यात आली आहे त्याचबरोबर या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातही पावसाची शक्यता आहे भंडारा नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा यवतमाळ या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तरी अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली वाशीम या ठिकाणी पावसाची विश्रांती घेतली आहे

Leave a Comment