Maharashtra Dairy scheme 2025 अंतर्गत व्यवसायाला नवी दिशा मिल्किंग मशिन खरेदीवर 50% अनुदान

महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालकांची साठी एक मोठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाने कृषी समृद्धी योजना (Krishi Samriddhi Yojana) अंतर्गत दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे या योजनेअंतर्गत मिल्किंग मशिन खरेदीसाठी 50 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे या उपकरणामुळे दूध उत्पादन वाढेल श्रमाची बचत होईल आणि दूध व्यवसाय अधिक आधुनिक करण आहे

योजनेचे उद्देश

कृषी समृद्धी योजना मुख्य हेतु म्हणजे शेतकरी व पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी आणि दुध उत्पादनात कृषी सुधारणा करणे पारंपारिक पद्धतीने दूध काढताना वेळ आणि श्रम दोन्ही खर्च होतो या पार्श्वभूमीवर शासनाने स्वयंचलित मिल्किंग मशीन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे दूध काढण्याची प्रक्रिया जलद स्वच्छ आणि संसर्ग मुक्त होईल या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांवरील कामाचा ताण कमी होईल तसेच शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षमतेने दूध काढणे शक्य होईल आधुनिक करण्याच्या मदतीने दूध व्यवसायाच्या गुणवत्तेत वाढ होऊन उत्पन्नही वाढेल

अनुदानाची रक्कम

  • या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिल्किंग मशीन खरेदीवर 50% अनुदान दिले जाणार आहे
  • मशनीच्या एकूण किमतीत 50 टक्के रक्कम किंवा कमाल 20 हजार इतकी अनुदान मिळेल
  • ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा होईल
  • लाभार्थ्यांची निवड संगणकीकृत रँडम पद्धतीने करता येणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असेल

पात्रता अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आले आहेत अर्जदाराकडे किमान 6 दुधाळ जनावरे असणे महत्त्वाचे असेल सर्वजण वर एनडीएलएफ (NDLF) अंतर्गत कानात टॅग लावलेले असावेत जनवराची नोंद भारत पशु धन ॲप (Bharat Pashudhan App) वर झालेली अर्जदाराने शासन किंवा खाजगी दूध संघाला सलग्न तीन महिने दूध पुरवठा केलेला असावा या अटी पूर्ण करणाऱ्या पशुपालकांचा या योजनेत लाभ मिळणार आहे शासनाचा उद्देश खऱ्या अर्थाने दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सहाय्य करणे हा आहे

How to apply for Krishi Samriddhi Yojana अर्ज प्रक्रिया

या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी खालील प्रक्रिया पूर्ण करावी 

अर्जाचा नमुना संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे अर्जदाराने सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे पात्रता अर्जाची तपासणी करून निवड झालेल्या शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात मिल्किंग मशिन खरेदीसाठी मंजुरी देण्यात येईल अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होईल

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत
दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेचे प्रमाणपत्र 
जनावराच्या टॅग क्रमांकाची माहिती 
भारत पशुधन ॲप वरील नोंदणीचा पुरावा 
मशीन खरेदी ची कोटेशन किंवा दर पत्रक 
कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यास अर्ज प्रक्रिया सुलभ होईल

योजनेत फायदे

मिल्किंग मशीन मुळे दूध काढण्याची प्रक्रिया जलद आणि सुरक्षित होईल मानवी श्रम व वेळही दोन्हीची बचत होईल दुधाची गुणवत्ता सुधारणे आणि संसर्ग होणाऱ्या धोका कमी होईल आधुनिक उपकरणामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होईल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल महिलांना दैनिक श्रमातून दिलासा मिळेल आणि दूध व्यवसाय अधिक बनेल या योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगार व आर्थिक विकासालाही चालना मिळेल

शासनाचा हेतू

राज्य सरकारचा उद्देश म्हणजे दूध व्यवसायाला आधुनिकडे नेणे आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेतकरी दूध व्यवसायावर अवलंबून आहेत त्यामध्ये त्याच्यासाठी हे अनुदान म्हणजेच आर्थिक बळकटी मिळवून सुवर्णसंधी आहे

कृषी समृद्धी योजना अंतर्गत शासनाने यापूर्वी ड्रोन, शेततळे बीबीएफ यंत्रे सुविधा केंद्र अशा अनेक घटकांसाठी अनुदान दिले आहे आता दुग्ध व्यवसायालाही समान महत्त्व देत हे नवे पाऊल उचलले उचललेले आहे

निष्कर्ष : कृषी समृद्धी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पशुपालनासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे 50 टक्के अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या मिल्किंग मशीन हे दूध व्यवसायासाठी क्रांतिकारी ठरणार आहे या उपकरणामुळे उत्पादन क्षमता वाढेल कामाचा वेळ कमी होईल आणि दूध व्यवसाय उत्पादन आधुनिकीकडे पूर्ण होईल शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल आणि ग्रामीण भागातील दूध व्यवसाय उद्योग नवे बळ मिळेल म्हणूनच इच्छित पशुपालकांनी 22 नोव्हेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा

Leave a Comment