शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनामार्फत Trocter anudan yojana mahadbt ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान किंवा कमाल ₹1,25,000 पर्यंतचे अनुदान दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर लाभ दिला जातो, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
अर्ज कसा कराल? (Online Arj Process)
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
अर्ज करण्यासाठी संबंधित वेबसाइटची लिंक दिलेली आहे. ती उघडा. - “वैयक्तिक शेतकरी” पर्याय निवडा
त्यानंतर तुमचा शेतकरी आयडी (Farmer ID) टाका व OTP पाठवा या बटणावर क्लिक करा.- तुमचा शेतकरी आयडी माहिती नसेल तर खाली दिलेल्या लिंकवरून तपासू शकता.
- OTP टाकून “OTP तपासा” क्लिक करा
नंतर तुमची प्रोफाइल 100% पूर्ण आहे का ते पाहा.
पूर्ण नसेल तर प्रोफाइल अपडेट करावी लागेल.
घटकासाठी अर्ज कसा करायचा?
- डाव्या बाजूला “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर,
- मुख्य घटक – कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसाहाय्य निवडा.
- तपशील – ट्रॅक्टर
- व्हील ड्राईव्ह प्रकार – 2WD किंवा 4WD (अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घ्या)
- एचपी रेंज – 31-40, 41-70 इ.
- पूर्वसमती टिक करा आणि “जतन करा” या बटणावर क्लिक करा.
अर्ज सादर कसा करायचा?
- पुन्हा “घटकासाठी अर्ज करा” मध्ये जाऊन
“बाबी निवडा” > “अर्ज सादर करा” वर क्लिक करा. - अटी व शर्ती मान्य कराव्यात आणि “अर्ज सादर करा” वर क्लिक करा.
अर्जाची स्थिती तपासा
- डाव्या बाजूला “घटक इतिहास पाहा” या पर्यायावर क्लिक करून तुम्ही:
- अर्जाची पावती डाऊनलोड करू शकता.
- वेटिंग लिस्ट पाहू शकता.
- तुमचा अर्ज मंजूर झाला का हे तपासू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज कर ऑप्शन वर क्लिक करा
शेतकरी मित्रांनो, मोबाईल, लॅपटॉप किंवा पीसीच्या मदतीने तुम्ही सहजपणे ट्रॅक्टरसाठी अनुदान अर्ज करू शकता. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा आणि वेळेत अर्ज सादर करा.