राज्यातील अनेक दिवसांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे महाडीबीटी फार्मर स्कीम च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला असून या संदर्भात 5 फेब्रुवारी 2026 रोजी 2 महत्त्वाचे शासन (जीआर) निर्गमित करण्यात आले आहेत या जीआर नुसार एकूण 340 कोटी रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे
यामध्ये सूक्ष्म सिंचन योजनेसाठी तसेच प्रकल्प आधारित घटकांसाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे प्रति थेंब अधिक पिक सूक्ष्म सिंचनासाठी 178 कोटी रुपयाचा निधी पहिल्या जीआर नुसार प्रति थेंब अधिक पीक या घटकांतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि इतर सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 178 कोटी 11 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीमध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 106 कोटी रुपये असून राज्य शासनाचा हिस्सा 71 कोटी रुपये आहे हा निधी सर्वसाधारण प्रवर्ग आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तीन वर्गासाठी वितरीत करण्यात येणार आहे
राज्य शासनाच्या वाटपा नुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी 57 कोटी रुपये अनुसूचित जातीसाठी 7.77 कोटी रुपये अनुसूचित जमातीसाठी 6. 16 कोटी रुपये तर केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 85 कोटी रुपये अनुसूचित जातीसाठी 11 कोटी रु अनुसूचित जमातीसाठी उर्वरित निधी या माध्यमातून सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सर्वसाधारण प्रवर्गासाठी 5 टक्के अनुदान तर उर्वरिक शेतकऱ्यांसाठी 45 टक्के अनुदान वितरित करण्यात येणार आहे
प्रकल्प आधारित घटकांसाठी 162 कोटी रुपये मंजुरी दुसऱ्या जीआर नुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे येणाऱ्या प्रकल्प आधारित घटकांसाठी एकूण 162 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 130 कोटी रुपये अनुसूचित जातीसाठी 17 कोटी रुपये अनुसूचित जमातीसाठी 14 कोटी रुपये हा निधी देखील थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरण करण्यासाठी वापरण्यात येणार आहे
प्रलंबित अनुदान लवकरच वितरित होण्याची शक्यता
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे प्रशासन एक प्रक्रिया रखडली आहे मात्र आता निधी प्राप्त झाल्याने निवडणुका संपल्यानंतर अनुदान वितरण वेगाने सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अनेक शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून सूक्ष्म सिंचन व कृषी प्रकल्पाच्या अनुदानासाठी प्रतीक्षेत होती या नव्या निधीमुळे हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार असून शेतीच्या आधुनिकेला मोठा चालना मिळणार आहे शेतकऱ्यांना साठी मोठी सकारात्मक बदल सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर उत्पादन वाढ आणि खर्चात बचत शक्य होती तसेच प्रकल्प आधारित योजनेमुळे शेती उद्योग साठवून प्रक्रिया उद्योग यांना चालना मिळते या दोन्ही घटकांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी राज्यातील कृषी विकासाला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय मोठा टप्पा मानला जात आहे
निष्कर्ष. महाडीबीटी स्कीम अंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी मंजूर झालेला 340 कोटी रुपयांचा निधी हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे सूक्ष्म सिंचन आणि प्रकल्प आधारित योजनेसाठी होणार अनुदान वितरण लवकरच सुरू झाल्यास हजारो शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळेल शासनाच्या या निर्णयात शेती आणि अधिक सक्षम आधुनिक आणि फायदेशीर बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे






