जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी( Mahdbt portal पोर्टल हे आज अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे ट्रॅक्टर अनुदान कधी येणार? फळबाग लागवडीसाठी निधी उपलब्ध आहे का? विहिरीच्या अर्जाला पैसे मिळणार की? नाही असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांकडून सातत्याने विचारले जातात अनेक वर्तमानपत्रांमध्ये निधीअभावी योजना थांबवल्या अशा बातम्या येतात मात्र या सर्व प्रश्नांचे अधिकृत आणि अचूक उत्तरे आपल्याला ऑनलाईन घरबसल्या आणि अवघ्या एका मिनिटात पाहता येतात हे फार कमी शेतकऱ्यांना माहिती आहे कृषी महाराष्ट्र Agri Maharashtra या अधिकृत वेबसाईटवर माध्यमातून राज्यातील सर्व कृषी योजनेचा निधी ची संख्या मजुरी पूर्वसंमती (Pre Sanction) आणि प्रत्यक्ष वितरित रक्कम याची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे
राज्यातील एकूण निधी आणि मंजुरीची स्थिती
महाडीबीटी (mahadbt anudan vatap sthiti 2026) च्या माध्यमातून योजना सुरू झाल्यापासून आज पर्यंत 13,519 कोटी 50 लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याची नोंद डॅशबोर्डवर आहे मात्र आपल्याला सध्याच्या आर्थिक वर्षाची स्थिती पाहण्याची असल्यास Financial Year मध्ये 2025-26 निवडणे महत्वाचे आहे
2025- 26 या आर्थिक वर्षात राज्यातील विविध कृषी योजनेसाठी
- 5,920 कोटी 67 लाख रुपयाची पूर्वसंमती (Pre Sanction) देण्यात आलेली आहे
- 1,350 कोटी 93 लाख रुपयाचे अर्ज मंजूर झाले आहेत
- त्यापैकी फक्त 324 कोटी रुपये प्रत्यक्षात वितरित करण्यात आलेले आहेत
यावरून स्पष्ट होते की मोठ्या प्रमाणात अर्ज मंजूर असूनही अनेक लाभार्थी निधी वितरणाच्या प्रतीक्षेत आहे
ट्रॅक्टर अनुदानाची नेमकी स्थिती काय
राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेली योजना म्हणजे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसह विविध यांत्रिक अवजारे येतात
या योजनेत.
- 3,515 कोटी 67 लाख रुपयांची पूर्व संमती देण्यात आलेले आहे
- 804 कोटी 28 लाख रुपयांचे अर्ज मंजूर झाले आहेत
- मात्र फक्त 261 कोटी 78 लाख रुपये वितरित झालेले आहेत
विशेष ट्रॅक्टर घटका बाबत पाहिले तर.
- 141 कोटी रुपयाची पूर्वसंमती
- 357 कोटी 12 लाख रुपयाचे अर्ज मंजूर
- फक्त 108 कोटी रुपये प्रत्यक्ष वितरित
याचा अर्थ ट्रॅक्टर अनुदानाचे मोठ्या प्रमाणावर पेमेंट अजूनही प्रलंबित आहे
फळबाग लागवड योजनेची स्थिती
भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे मात्र या योजने अंतर्गत 263 कोटी रुपयांची मंजुरी आहे त्यापैकी 78 लाख रुपयाचे अर्ज मंजूर आणि फक्त 4 लाख रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत यावरून फळबाग योजनेसाठी निधी उपलब्ध असला तरी वितरणाचा वेग अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट होते
अर्जाची एकूण आकडेवारी (2025-26)
2025-26 या वर्षात
- 45 लाख अर्ज दाखल
- 7 लाख अर्जांना पूर्वसंमती
- 2.44 लाख अर्ज मंजूर
- मात्र फक्त 60 हजार लाभार्थ्यांना निधी वितरित
ही आकडेवारी पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या अर्जाची स्थिती असणे अत्यंत गरजेचे ठरते
निष्कर्ष महाडीबीटी डॅशबोर्ड मुळे शेतकऱ्यांना अंदाजावर नाहीतर अधिकृत आकडेवारी आधारित माहिती मिळत आहे कोणत्या योजनेसाठी किती निधी उपलब्ध आहे किती अर्ज मंजूर झाली आहे आणि वितरित कुठून कुठपर्यंत आले आहेत हे सगळे एका क्लिकवर पाहता येते त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेणे हेच शेतकऱ्यांच्या हिताचे ठरते आहे
घरबसल्या माहितीच योग्य नियोजन आणि वेळेवर अर्ज हाच महाडीबीटी चा खरा फायदा आहे





