DBT FOR Farmers 2025 : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 337 कोटीचा आर्थिक सहाय्य – मंजूर खात्यात थेट जमा

Maharashtra farmer Grant 2025 : राज्यांमध्ये फेब्रुवारी ते मे 2025 च्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 337 कोटी 41 लाख 53 हजार रुपये अनुदानास वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे

यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे (Farmer Compensation scheme Maharashtra) राज्य सरकारने एकूण 34 जिल्ह्यातील तीन लाख 98 हजार 603 बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये छत्रपती संभाजी नगर लातूर परभणी हिंगोली बीड धाराशिव जालना जिल्ह्यासह पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदूरबार जळगाव अहिल्यानगर सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ वाशीम वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे

तसेच नागपूर विभागातील 5,914 बाधित शेतकऱ्यांसाठी 34 कोटी 91 लाख 36 हजार रुपयांचा तर अमरावती जिल्ह्यातील 54 हजार 729 शेतकऱ्यांना 66 कोटी 91 लाख 11 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 67 हजार 432 शेतकऱ्यांसाठी 59 कोटी 98 लाख 20 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर पुणे विभागातील 1 लाख 7 हजार 463 बाधित शेतकऱ्यांना 81 कोटी 26 लाख 26 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असून

कोकण विभागातील 13 हजार 608 शेतकऱ्यांना 9 कोटी 38 लाख 24 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर नाशिक विभागातील 1 लाख पाच हजार 147 बाधित शेतकऱ्यांना 85 कोटी 67 लाख 8 हजार रुपयांचा निधी मान्यता देण्यात आली आहे राज्य सरकार विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या (Farmer Compensation scheme Maharashtra) नुकसानीसाठी शेतकऱ्यांना एकनिष्ठ अनुदान देते

परंतु अलीकडचे राज्य सरकारने या अनुदानात कापत करत जुन्या दाराने निविष्ट अनुदान वितरणाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी नाराज आहे त्याच दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित अर्थात डीबीटी ( dbt) च्या माध्यमातून अनुदान वाटप करण्यात येणार असून अनुदानासाठी शेतकरी केवायसी (KYC for farmer compensation) करून घेणे आवश्यक असेल

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment