मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबरचा थकीत हप्ता अखेर खात्यात जमा होण्यास सुरुवात

November Hafta update 2025 राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे मोठ्या प्रतिक्षेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आज 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजल्यानंतर आधार डीबीटी (Direct Benefit Transfer) माध्यम पुन्हा हा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्या मध्ये क्रेडिट होत असल्याची माहिती समोर आली आहे

यापूर्वीच राज्य शासनाकडून या हप्त्याची वितरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता मात्र राज्यात महानगरपालिका व नगरपालिका च्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याचे वितरण तात्पुरती स्थगित ठेवण्यात आले होते त्यामुळे अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते नंबर व डिसेंबर महिन्याच्या हप्ता एकत्रच मिळणार का की आचार संहिता संपल्यानंतरच पैसे खात्यात जमा होतील असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात होती

डिसेंबर महिन्याच्या हप्ता यासाठी अद्याप निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे तो हप्ता कधी मिळणार याबाबत अनिश्चितता होती अशा परिस्थितीत नोव्हेंबर महिन्याच्या थकीत हप्ता आजपासून वितरित होण्यास सुरुवात झाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे सध्या ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अध्याप रक्कम जमा झालेली नाही किंवा बँकेकडून मेसेज प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे काही महिला पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे

विशेष केवायसी (KYC) करण्याचा शेवटचा दिवस संपल्यानंतर आखेत अनेक महिलांना असे वाटत आहे की केवायसी पूर्ण न झाल्यामुळे आपला हप्ता मिळालेला नाही नसेल मात्र उपलब्ध माहितीनुसार सध्या वितरित होत असलेला हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता केवायसी पूर्ण झाली आहे किंवा नाही या आधारावर ठरवला जाणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे पात्र असलेल्या बहुतेक महिलांना हा हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे

आज अनेक लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली असून येत्या 1 ते 2 दिवसात उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे राज्यात अजूनही महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही हप्ता वितरणाने सुरुवात झाल्याने आचारसंहितेचे मध्ये नेमकी कशा प्रकारे शीतलता देण्यात आली किंवा कोणत्या परवानगीनंतर हे वितरण सुरू झाले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

एकंदरीत आचारसंहितेचे कारण देत अनेक दिवस थकीत असलेल्या नोव्हेंबर महिन्याचा आता अखेर लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ लागला आहे यासंदर्भातील पुढील अधिकृत अपडेट डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या हात्याबाबतची माहिती लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता असून याबाबतची सविस्तर माहिती वेळोवेळी समोरील येईल

Leave a Comment