राज्यामध्ये 2023 च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहाणी पोर्टल वरील नोदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान राज्य सरकारने जाहीर केले आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर कापूस सोयाबीन नोंद आहेच अशाच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला असून यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करणे फार महत्त्वाचे आहे
ई-केवायसी करण्यासाठी ई सेवा केंद्र कृषी सा-याची मदत घेता येते व घरच्या घरी मोबाईल वरून ही केवायसी करता येणार आहे कृषी विभागाच्या माहिती अनुसार खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपली आधार संमती दिली आहे त्यानं नंतर नमो शेतकरी महा सन्मान निधी 47 लाख शेतकऱ्यांचे आधार क्रमांक जुळले आहे
व उर्वरित 21 लाखा पैकी दोन लाख शेतकऱ्यांनी 25 सप्टेंबर अखेर ही ई केवासी केली आहे उरलेल्या 19 लाख शेतकऱ्यांची ई केवायसी अजून बाकी आहे
तर कशा पद्धतीने ई- केवायसी केली जाते
- ई सेवा केंद्र यामध्ये तुम्ही ई केवायसी करू शकतात
- कृषी सहाय्यक कडे आपण ई केवायसी करू शकतात
- प्रत्यक्ष संकेतस्थळावर जाऊन आपण केवायसी करू शकतात
E-KYC कशी करायची
https://scagridbt.mahait.org/ या संकेत स्थळावर जाळून त्यानंतर तुम्हाला या स्टेटस हे दोन ऑप्शन दिसेल
त्यामध्ये तुम्हाला डिस्बसमेट स्टेटस निवडा नंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून त्याचा कोड भरायचा आहे आणि केवायसी कोणत्या पद्धतीने करायचे आहे ते निवडायचे आहे त्यानंतर गेट आधार ओटीपी त्यावर क्लिक करून आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर ओके या बटणावर क्लिक करून आपली ई- केवायसी पूर्ण झाली असं म्हणता येईल