कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर अवजारे खरेदीवर 50 % अनुदान शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी..

सरकारने आता कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजनेअंतर्गत पॉवर टेलर ट्रॅक्टर अवजारे आणि प्रक्रिया यंत्रसामग्री खरेदीसाठी 50% टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे या योजनेमुळे शेती अधिक आधुनिक सोपी आणि फायदेशीर होणार आहे योजने अंतर्गत कर्ज साठी नोंदणी करून योजनेचा लाभ घेता येतो तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे

  • अर्ज प्रक्रिया https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी नोंदणी करावी
  • नोंदणी करताना नाव पत्ता आधार क्रमांक मोबाईल क्रमांक तसेच बँक खात्याचे तपशील भरावेत
  • त्यानंतर शेतीचा तपशील आणि गाव तालुका सातबारा उतारा व यंत्रसामग्रीचे निवड करावी
  • निवडलेल्या यंत्रांचे अधिकृत कोटेशन अपलोड करणे आवश्यक आहे

अर्ज करतेवेळेस पुढील कागदपत्रे अपलोड करावे

  1. आधार कार्ड
  2. शेतकरी ओळखपत्र
  3. बँक खाते पासबुक
  4. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावी

अनुदानाचे नियम आणि मंजुरी

अर्ज सबमिट केल्यानंतर Application ID मिळतो ज्याद्वारे अर्ज स्थिती तपासता येते अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत हाताळणीसाठी पाठवला जातो त्यानंतर अर्जाची स्थिती वेळोवेळी संकेतस्थळावर ओपन करून पाहता येते राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनेसाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे ज्यामुळे महाडीबीटी च्या योजनेअंतर्गत अर्ज करणे शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे महाडीबीटी च्या योजनेसाठी राज्य सरकारने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू केली आहे

अर्ज रखडले का

राज्यामध्ये महाडीबीटी योजनेअंतर्गत विविध शेतकरी अर्ज करतात परंतु अर्जाची सोडत वेळोवेळी केली जात नाही त्यामुळे आज रखडले आहे राज्यात कृषी विभागाच्या योजनेसाठी 45 लाख अर्ज निधी अभावी अद्यापही प्रलंबित आहे त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज करूनही ते प्रतीक्षेत आहे अधिक माहिती आणि मदत योजना शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि वापरण्यासाठी मदत करणारी ठरत आहे त्यामुळे वेळेत अर्ज करा अर्जाची स्थिती तपासा आणि मंजुरी मिळाल्यानंतरच यंत्रे खरेदी करून योजनेचा फायदा घ्या

अधिक माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करू शकता

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment