अद्रक आणि मिरची पिकांना अतिवृष्टीचा फटका..

अद्रक आणि मिरची पिकांना अतिवृष्टीचा फटका धावडा परीक्षा परिसरातील अद्रक पिकावर रोगाचा प्रादुर्भाव लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी अहिराणी तसेच धावडा भोकरदन तालुक्यातील मागील आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अद्रक आणि मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून

यामुळे शेतकऱ्यांना बेण्याचा खर्च निघणे कठीण झाले आहेत शेतकरी हैराण झाले त्या प्रकारे गतवर्षी बाजारपेठेमध्ये आद्रकला बारा हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव होता त्यामुळे यंदा धावडा परिसरातील भोरखेडा वाढोना वालसावंगी शेलुद वडोद तांगडा भागातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात अद्रकी ची लागवड केली आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

व मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अद्रकीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे उन्हाळ्यातील मिरचीला फटका बसला आहे या पावसामुळे आद्रक ला मर सड रोग लागला असून शेतकऱ्यांकडून मे महिन्यात अद्रकीचे लागवड केली जाते तर इतर शेतकरी मृग नक्षत्रामध्ये पावसानंतर बेडवर अद्रक ची लागवड करतात

त्यासाठी लागणाऱ्या बेण्याची दर किमान 11 ते 12 हजार रुपये प्रतिक्विंटल आहे एका एकरात जवळपास आठ क्विंटल बेण्याची लागवड केली जाते याशिवाय पिकाला निंदणी आणि खताचा अधिक प्रमाणात खर्च येतो सध्याच्या स्थितीत सड लागत असल्याने शेतकऱ्यांना अद्रक अर्धवट अवस्थेमध्ये कोवळी असतानाच काढून घ्यावी लागत असल्याचे समोर आले आहे

त्याचे परिणाम त्यांच्या दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे उन्हाळी मिरची वरील रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे सध्या मिरचीला चांगला भाव मिळत आहे परंतु त्यावर रोप वाढल्याने मिरचीचे उत्पादन होत नसल्याचे शेतकरी संघटनांमध्ये शेतकरी सांगत आहे

Leave a Comment