खरीप हंगाम 2025 पिक विमा वितरणाबाबत मोठी अपडेट : शेतकऱ्यांना नेमके किती मिळणार ?

जय शिवराय मित्रांनो kharip hangam pik vima 2025 चा तारखेत पिक विमा बाबत राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत पिक विमा खात्यात कधी जमा होणार मला किती रक्कम मिळणार 17 हजार रुपये हेक्टरी मिळतील का अशा चर्चांना सध्या जोर आला आहे कालावधी संपूनही अजून पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा झालेली नाही दरवर्षी नोव्हेंबर पासून वितरण सुरू होते 15 जानेवारीपासून सुरू होईल असे सांगण्यात आले होते उशीर झाल्यास दंड आकारला जाईल असेही जाहीर करण्यात आले तरीदेखील प्रक्रिया पुढे सरकताना दिसत नाही

kharip hangam pik vima 2025 | 89 लाख शेतकरी नुकसानग्रस्त

केंद्रीय कृषिमंत्री याकडे राज्य सरकारकडून सादर केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 89 लाख शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान ग्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहेत राज्य सरकारचा डाटा केंद्र पाठवण्यात आला असून तो विमा कंपनीकडे कॅल्क्युलेशन साठी पाठवला जातो या संपूर्ण प्रक्रियेमुळे वितरणात विलंब होत असल्याचे सांगितले जाते आहे

सुधारित पीक विमा योजना 2025

kharip hangam pik vima 2025 पासून राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे ही योजना प्रधानमंत्री फसल बिमा योजना (PMFBY) अंतर्गत राबवली जाते त्यामध्ये वैयक्तिक नुकसान या ऐवजी मंडळ स्तरावर नुकसान मोजले जाते म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाले आणि दुसऱ्याचे 50 टक्के नुकसान झाले तर संबंधित महसूल मंडळासाठी मंजूर झालेले शेतकरी भरपाई सर्वांना समान प्रमाण मिळते या योजनेत 50 टक्के नुकसान पद्धतीने आणि उर्वरित 50 टक्के नुकसान सेटलाईट इमेजरी व तंत्रज्ञान आधारित पद्धतीने ठरवले जाते गेल्या सात वर्षांतील पाच सर्वोत्तम उत्पादन वर्षाची सरासरी आणि या वर्षीचे प्रत्यक्ष उत्पादन याची तुलना करून नुकसानीची टक्केवारी निश्चित केली जाते

17 हजार रुपये हेक्टरी वास्तवात काय

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हेक्‍टरी 17 हजार रुपये पर्यंत विमा मिळू शकतो अशी घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात ती रक्कम सर्वांना मिळेलच असे नाही कारण अंतिम रक्कम ही महसूल मंडळाच्या सरकारी नुकसान यावर आधारित असते तज्ञांच्या मते काही महसूल मंडळांमध्ये 17 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मिळू शकते परंतु हा अनेक ठिकाणी सरासरी 8 ते 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम मर्यादित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे माझे शंभर टक्के नुकसान झाले मला पुर्ण 17000 मिळतील का या प्रश्नाचे उत्तर नाही कारण ही योजना वैयक्तिक नुकसान यावर आधारित नाही

282 तालुके घोषित नुकसानग्रस्त

राज्य सरकारने 253 तालुके पूर्णता बाधित आणि 29 तालुके अशांत बाधित असे एकूण 282 तालुके नुकसानग्रस्त घोषित केले आहेत या तालुक्यातील महसूल मंडळांना विमा मिळण्याची शक्यता अधिक आहे मात्र अंतिम निर्णय कॅल्क्युलेशन नंतरच जाहीर होईल

kharip hangam pik vima 2025 -वितरण कधी होणार

सध्या घडामोडी नुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत विमा वितरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 24-25 तारखे नंतर महत्त्वाचे अपडेट येऊ शकते ज्यामध्ये पात्र मंडळाची यादी आणि अंतिम गणित जाहीर होऊ शकते

शेतकऱ्यांनी काय करावे

शेतकऱ्यांनी आपल्या पॉलिसीचा टेटस नियमित पी PMFBY पोर्टल किंवा मोबाईल ॲप वर तपासत रहा कैलकुलेशन पूर्ण झाल्यावर संबंधित माहिती पोर्टलवर दिसू लागेल बँक खात्याशी आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक आहे का? याची खात्री करून घ्यावी

निष्कर्ष. एकंदरीत 2025 चा खरीप पिक विमा वितरण प्रक्रियेत तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला आहे तरी 17 हजार रुपये हेक्टरी अशी घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात मिळणारी रक्कम मसूल मंडळाच्या सरासरी नुकसान यावर अवलंबून असेल अनेक ठिकाणी रक्कम अपेक्षेपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेट ची वाट पहावी येत्या काही दिवसात स्पष्ट चित्र समोर येईल अशी शक्यता आहे तोपर्यंत आपल्या पॉलिसीची माहिती तपासात रहा आणि अधिकृत गोष्टीकडे लक्ष ठेवा धन्यवाद

Leave a Comment