महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील भूमिहीन कुटुंबांना स्वतःची शेत जमीन मिळावी आणि त्यांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण व्हावे याकरिता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शेत जमीन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते ही योजना केवळ आर्थिक मदत नसून भूमिहीन कुटुंबांना सन्मानाने जगण्याचा आणि स्थिर उत्पन्नाचा मार्ग देणार आहे योजनेअंतर्गत जमिनीचा दर किती मिळणार या योजनेसाठी शासनाने जमीन खरेदीचे कमाल दर निश्चित केले आहेत हे दर प्रती एकर पुढील प्रमाणे आहे जिरायती पावसावर अवलंबून जमीन प्रति एकर 5लाख बागायती सिंचन जमीन प्रति एकरी 8 लाख या दाराच्या मर्यादित राहून असं जमीन खरेदीसाठी अनुदान देत आहे
योजनेत किती जमीन खरेदी करता येऊ शकते
लाभार्थ्याला जास्तीत जास्त खालील प्रमाणे जमीन खरेदी करता येऊ शकते जिरायती जमीन कमाल ४ एकर बागायती जमीन कमाल २ एकर म्हणजेच लाभार्थ्याला स्वतःची शेती सुरू करण्यासाठी आवश्यक इतकी जमीन या योजनेतून मिळू शकते
योजनेसाठी कोण पात्र आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदार अनुसूचित जाती (sc) किंवा नवबौद्ध घटकातील असावी अर्जदाराचे पूर्णपणे भूमिहीन असावे स्वतःच्या नावावर शेतजमीन बिलकुल नसावी वय किमान 18 वर्षे आणि कमाल 60 वर्षे पर्यंत असावी दारिद्र्य रेषेखालील कुटुंब परित्यक्ता / विधवा महिला अत्याचारग्रस्त व्यक्तींना प्राधान्य दिले जाते
योजने करता महत्वाच्या नोंदी
सध्याच्या परिस्थितीत अनेक भागात शेतजमीन बाजार भाव शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आहेत त्यामुळे योग्य जमीन उपलब्ध होणे कठीण जात आहे अनेक पात्र लाभार्थ्यांना शेत जमीन शोधताना अडचणी आहेत यामुळे योजनेतील अनुदानाची मर्यादा वाढवावी अशी मागणी विविध संस्थेतून होत असून पुढील प्रक्रिया चालू आहे
योजनेचे मुख्य फायदे
भूमिहीन कुटुंबांना स्वतःची शेती जमीन
मजुराचे अवलंबित्व कमी होते
शेतीतून नियमित उत्पन्नाचा मार्ग खुला होतो
सामाजिक सन्मान व स्वाभिमान वाढतो
पुढील पिढी सुरक्षित भविष्य निर्माण होते
अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधा नाही अर्ज खालील ठिकाणी मिळतो तालुका जिल्हा समाजकल्याण कार्यालय किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी (Social Welfare Offlcer) यांच्याकडे
- अर्ज भरणे
अर्ज स्वतःच्या किंवा कार्यालयाच्या मदतीने भरा सर्व माहिती अचूक भरून कागदपत्राची जुळणारी असावी अपूर्ण अर्ज स्वीकारला जात नाही
- अर्ज सादर करणे
भरलेला अर्ज सर्व कागदपत्रे तालुका जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जमा करा अर्जाची पोच पावती हा Acknowledgement घ्या
- छाननी व निवड
आलेल्या अर्जाची कागदपत्र तपासणी प्रत्यक्ष चौकशी गरज असल्यास पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होती मंजूर लाभार्थ्यांना पुढील प्रक्रिया कळवली जाते जमीन खरेदी आणि अनुदान लाभ मंजूर झाल्यानंतर शासनामार्फत शेती जमीन खरेदीसाठी १००% अनुदान जमीन खरेदीच्या नावावर नोंदणी केली जाते
महत्वाची सूचना : ब्रोकर यांना पैसे देऊ नका ही योजना पूर्णपणे शासनाच्या असून मोफत आहे अर्ज सुरू नसतील तर कार्यालयात नाव नोंदणी (Waiting List) करून ठेवा
निष्कर्ष : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही महाराष्ट्रात मधील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबानं करिता एक अत्यंत महत्त्वाची योजना असून जिरायती साठी पाच लाख आणि बागायती साठी आठ लाख प्रति एकर असा दर निश्चित करून शासनाने जमीन खरेदीचा मार्ग खुला केला आहे मात्र बदलत्या बाजारभावानुसार या योजनेत सुधारणा होणे खूप महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट होत आहे





