सोयाबीन आणि कापूस हे महाराष्ट्रामध्ये उत्पादन होणारे महत्वाचे नगदी पीक आहे या पिकाच्या लागवडीचे विचार केला तर राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या तीन विभागांमध्ये या दोन्ही पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होते मात्र गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन आणि कापसाचे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे वास्तवात आली आहे बाजारामध्ये मिळत असलेला भाव पाहता गेल्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या या पिकांसाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही व दरवर्षी प्रमाणे नवीन पीक विजयादशमीच्या सुमारास बाजारात येते असते
म्हणजेच यंदा कापसाचे नवीन पीक येण्यासाठी अवघ्या काही दिवसाचा काळ बाकी राहिला आहे यंदाही विजय दशमी पासून नवीन कापसाची लागवड होणार आहे अशाच राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे जर तुम्ही ही यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे लागवड केली आहे तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार नवीन बाजारामध्ये येण्यापूर्वीच कापसाच्या बाजारभावात चांगले सुधार झाली आहे त्यामुळे कापूस बाजारात येईल तेव्हा ही कापसाला चांगला दर मिळणार अशी आशा व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या आशा पूर्ण व्होयात
सध्या बाजारामध्ये कापसाला काय दर मिळतोय..
बाजारात मिळालेल्या माहितीनुसार आज कापूस बाजार भावात आशादायक चित्र पाहायला मिळाले सहा सप्टेंबर 2024 रोजी दुपारी पर्यंत देशात आणि आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली आहे कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत 70.05 सेंटर च्या दरम्यान होते तसेच देशातील वायदे वाढून 51 हजार 200 रुपये प्रतिखंडी वर पोहोचले होते देशांतर्गत बाजारात मात्र दर भावा स्थिर असल्याचे दिसून आले
बाजार समिती मध्ये आज 6 हजार 900 रुपये ते 7 हजार 500 रुपयांचा भाव मिळाला आहे महत्वाचे म्हणजे बाजारात अभ्यासकांनी काही दिवस कापसाच्या भावात ही स्थिर कायम राहणार आहे त्याबद्दल सांगितले आहे सोयाबीन बाबत बोलतोय तर देशात बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयाच्या भाव मिळत आहे तसेच देशांमधील प्रक्रिया प्लांटचे खरेदी भाव आज 4 हजार 600 ते 4 हजार 700 75 रुपयांच्या दरम्यान होते शेती क्षेत्रातील तज्ञांनी सोयाबीन बाजार आणखीन काही दिवस चढ-उतार होऊ शकते असा अंदाज दिला आहे